पालकमंत्री आदीती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात भरवला जनता दरबार


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, महाराष्ट्र राज्य उद्योग, क्रीडा, पर्यटन, राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी शनिवारीम्हसळा तालुक्यात जनता दरबार भरवुन पहिलाच तालुका दौरा केला. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे अधिकारी वर्ग व कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
   पाचगाव आगरी समाज सामाजिक सभागृहात आयोजित जनता दरबारात पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी जनतेची लेखी निवेदन स्वीकारून निवेदनात जनतेनी मांडलेल्या समस्या संबंधित शासकीय अधिकारी वर्गासमोर मांडुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. आयोजित जनता दरबारात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मी विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदार होईल ही शाश्वती होती पण मंत्री होईल असे वाटले नव्हते परंतु जनतेच्या कृपाआशीर्वादाने मला महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री आणि रायगड जिल्हा पालकमंत्री पद प्राप्त झाले त्या मुळे माझ्या वर आता जबाबदारी वाढली आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी जनता दरबारात संबोधित करताना केले तसेच स्थानिक आमदार म्हणून पाच वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला वेळ द्या अशी अपेक्षा हि व्यक्त केली.
या वेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत रायगड जिल्हा कृषी सभापती बबन मनवे, तहसीलदार शरद गोसावी, राष्ट्रवादीचे नेते अलिशेट कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझिम हसवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हलदे,गटनेते संजय कर्णिक,उपसभापती मधुकर गायकर,माजी सभापती छाया म्हात्रे,संदीप चाचले, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,फझल हलदे,नाझीम चोगले,संतोष पाटील,पीआय अश्वनाथ खेडकर,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,विज अभियंता वानखेडे आदी मान्यवर, शासकीय अधिकारी, ग्रामसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
    जनता दरबारात प्रामुख्याने ना.आदीतीताई तटकरे यांनी वीज, पाणी, रस्ते विकास, महिला बचत गट, एसटी स्थानक सुधारणा, पर्यटन विकास, धार्मिक स्थळे, खारबंदिस्ती आदि विषयावर शासकीय अधिकारी यांचे कडे चर्चा केली तसेच विविध प्रकारच्या प्रस्तावित कामांचे जनते मार्फत निवेदन स्वीकारले आणि योग्य वेळी विकास कामांबाबत पूर्तता करण्यात येणार असल्याचे आश्वाशीत केले. यावेळी कार्य आढाव्यात तालुका नेते अलिशेठ कौचाली यांनी शासकीय संकुल, रस्ते विकास, नानानानी पार्क, बाजरपेठ सुधारणा, पत्रकार भवन, जेष्ठ नागरिक भवन, कृषी विकास आदि कामांबाबत मागणी केली.

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या जनता दरबारात जनतेची गर्दी
श्रीवर्धन मतदार संघातील मतदारांनी दाखवलेल्या  विश्वासाला सार्थ ठरवत पालक मंत्री अदिती तटकरे यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. म्हसळा तालुक्यातील आगरी समाज सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित नागरिक व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्याशी संवाद साधला आहे. तालुक्यातील पेयजल प्रश्न, वाहतुक, रस्त्याची दुरावस्था, आरोग्य सेवा, शैक्षणिक प्रश्न ,व शासकीय  सेवा व संस्था इत्यादी विषयावर चर्चा करून त्या वर तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले .सदरच्या जनता दरबारात उपस्थित अधिकारी वर्गाची उलट तपासणी घेत तटकरे यांनी सर्वसामान्य जनतेच्या सर्व प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे निदर्शनांस  आले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा