श्रीवर्धन नगर परिषदेचा कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प ; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

श्रीवर्धनमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती नगर परिषदेचा ३१ गुंठे क्षेत्रात प्रकल्प , नागरिकांना सहकार्याचे आवाहन 

श्रीवर्धन : भारत चोगले
कोकणातील अनिश्चित लांबलेला पाऊस , प्रतिकूल वातावरण , स्थानिकाचा विरोध , कचरा प्रश्नाला वेळोवेळी देण्यात आलेला राजकीय रंग , कामगाराची वानवा दुर्गम भागात कोणतेही ठेकेदार काम करण्यास तयार नसणे या व यासारख्या असंख्य अडचणीवर मात करत श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने वेळप्रसंगी स्वतः जमिनीवर उतरत केवळ ३१ गुंठे क्षेत्रात कचऱ्यापासून खतनिर्मिती व खतविक्रीपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे . सद्यस्थितीत पावसाचे दिवस वगळता मागील चार महिन्यात सुमारे २० हजार रुपयांची खतविक्री नगरपरिषदेने केली आहे . ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येत आहे . त्याचा फायदा श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी , नर्सरी तसेच श्रीवर्धन शहरातील वाड्यांना होत आहे . सदरचे कंपोस्ट खत अतिशय नाममात्र दरात रु . ४ , रू ६ प्रती किलो या दराने दोन प्रति विक्रीसाठी उपलब्ध आहे . तसेच सुक्या कचऱ्यातील प्लास्टीक बॉटल्स , लोखंडयावरील सद्यस्थितीत प्रक्रिया करण्याचे सुरु होईल असे दिसून येते . सद्यस्थितीत घनकचरा प्रकल्पावर कचऱ्यामुळे तयार होणारे लिचेट द्रव साठवण्यासाठी तयार करण्यात आले आहे . त्यामुळे आजूबाजूच्या पाणी स्त्रोताचे संरक्षण होईल . तसेच Material recovery facility नावाचा विभाग सुरू करण्यात आला आहे . ज्याच्या द्वारे उत्पन्न निर्मितीला चालना मिळणार आहे . अशा अनेक घटनांचा सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर यशस्वीरित्या समावेश करून कार्यान्वित करण्यात आला आहे . विशेष म्हणजे श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने केवळ ३१ गुंठे क्षेत्रात सदरची कामे सुरळीतपणे सरु ठेवली आहेत . केवळ तांत्रिक अडचणीमळे सदर प्रक्रिया सरू होऊ शकली नाही . तथापि आगामी काळात महिना अखेर पर्यंत पावसाळा सुरू होण्यापुर्वी संपूर्ण क्षेत्र स्वच्छ व सुंदर होईल असा विश्वास प्रशासनामार्फत व्यक्त करण्यात आला , ओला व सुका कचरा स्वतंत्रदेण्याचे आवाहन आहे.

१० हजार कचरा पेट्या वितरित
या अंतर्गत सुमारे १० हजार कचरा पेट्या वितरित केल्या असून नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या दिल्यास व प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर पुर्णपणे बंद केल्यास सदर प्रकल्पावर येणार ताण कमी होऊन श्रीवर्धन शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त होत आहे .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा