संजय खांंबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यांत ८१ महसुली गावे आहेत. गाव तेथे पोलीस पाटील असे शासनाचे धोरण असून तालुक्यात केवळ २८ पोलीस पाटील कार्यरत आहेत , कार्यरत पोलीस पाटील मयत, रिटायर्ड या कारणाने १२ गावी पोलीस पाटलांच्या नेमणूका अगर कार्यभार दिला नसल्याने ती गावे वाऱ्यावर असल्याची माहीती पुढे येत आहे. म्हसळा पोलीस स्टेशनला तालुक्यातील ६६ गावे,दिघी सागरी पोलीस स्टेशनला ७ गावे, व गोरेगाव पोलीस स्टेशन अंर्तगत ८ गावे येत आहेत.
गावांमध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच चोरी, चोरीचा माल, कैदी, संशयित मृत्यू, विविध प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांना वेळोवळी माहिती देणे व प्रामुख्याने तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीसअधिका ऱ्यांना विविध तपासात नियमित सहकार्य करण्याचे काम, तसेच साथ रोग, नैसर्गिक आपत्ती या सारख्या महत्वाच्या कामात पोलीस पाटील चांगली भूमिका करीत असतात.
तालुक्यातील पोलीस पाटलांकडे असणारा आतिरीक्त कार्यभार पुढील प्रमाणे ( महसुली गाव व अंक स्वरूपात अतिरीक्त कार्यभार.
नेवरूळ ५, पांगळोली ४, रेवली, तळवडे , संदेरी,३, खरसई,केलटे, खामगाव, आगरवाडा,पाभरे, खारगांव ( बु ), गोंडघर ,२, निगडी, देवधर कोंड, सुरई, सोनघर, चिखलप, काळसुरी, गोडधर १ .
पोलीस पाटील पदे रिक्त असलेली तालुक्यांतील गावे पुढील प्रमाणे : कुडतोडी, ढोरजे,मोरवणे, देहेन, वांगणी,भापट, ताम्हने करंबे, कोलवट, चिरगाव, भेकऱ्याचा कोंड,रातीवणे, रोहिणी.
ग्रामीण भागात मुंबई नागरी कायदा १८५७ नुसार हे पद निर्माण करण्यात आले. गावांमध्ये पोलीस पाटलांकडे कायद्याचा प्रथम पालक म्हणून पाहिले जाते. कायदा व शासनाचे काम करताना पोलीस पाटलांना अनेक अडचणी येतात. घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावताना पोलिसांना योग्य ती माहिती व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या अटकेपर्यंतची मदत पोलीस पाटील करीत असतो.
"नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. नव्याने शासनाने पोलीस पाटलांच्या नेमणुका आरक्षणानुसार व लेखी चाचणी परीक्षा घेऊन पदे भरण्याचे नियम केले. काही गावातून आरक्षणा प्रमाणे लोकवस्ती नसते अशासारख्या अडचणी येत असतात, म्हसळा तालुक्यांतील अनेक गावातून मोठया प्रमाणात शाश्वत विकास होत असल्याने अतिरीक्त कार्यभार झेपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शासनाने रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे."
अनंत पाटील अध्यक्ष म्हसळा तालुका पोलीस पाटील संघटना तथा उपाध्यक्ष , रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटना.
पोलीस पाटलांची उपविभागनिहाय बिंदू नामावली अद्यावत करून त्यांची भरती प्रक्रिया संबंधित उपविभागीय कार्यालया-मार्फत केली जाते, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील रिक्त पदांची माहीती मा.जिल्हाधिकारी सो रायगड याना सादर करण्यात येईल त्यानी आदेश दिल्यावर कार्यवाही पूर्ण होईल.
अमित शेडगे , उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन.

إرسال تعليق