अकृषक वापरासाठी महसूल विभागाने बजावलेल्या जास्त रकमेच्या नोटिसा : आमदार अनिकेत तटकरेंनी घेतली बैठक.

अकृषक वापरासाठी महसूल विभागाने बजावलेल्या जास्त रकमेच्या नोटिसा, आमदार अनिकेतभाई  तटकरे यांनी घेतली बैठक.

 (श्रीवर्धन - विजय गिरी )

 श्रीवर्धन तालुका पर्यटकांसाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण बनलेले आहे. मात्र यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून सतत पडणारा पाऊस व चक्रीवादळ येणार असे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे तालुक्‍यात यावर्षी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीवर्धन शहरात ज्या मालकांची हॉटेल व रिसॉर्ट आहेत अशा हॉटेल, रिसॉर्ट मालकांना श्रीवर्धन महसूल विभागाने अकृषक वापर करत असल्याबद्दल जास्त रकमेच्या नोटिसा बजावल्या आहेत. अगोदरच धंदा नसल्यामुळे बेजार झालेल्या हॉटेल मालक यांनी सुतारवाडी येथे जाऊन आमदार अनिकेत तटकरे यांची भेट घेतली होती. श्रीवर्धन मधील हॉटेल व्यावसायिकांची श्रीवर्धन पर्यटन संस्था अशी एक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातूनच आमदार अनिकेतभाई  तटकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज दिनांक सहा जानेवारी रोजी श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृह मध्ये मी स्वतः श्रीवर्धन येथे येऊन या समस्येबाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. आज सकाळी 11 वाजता श्रीवर्धन पर्यटक संस्थेचे सर्व सभासद आमदार अनिकेतभाई तटकरे त्याचप्रमाणे प्रांताधिकारी अमित शेडगे तहसीलदार सचिन गोसावी यांच्यामध्ये बैठक पार पडली. पर्यटन संस्थेच्या वतीने शशिकांत महाडकर व अरुण सावंत यांनी आपल्या समस्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्याचप्रमाणे दिवेआगरचे सरपंच व पर्यटन व्यावसायिक उदय बापट हे देखील या बैठकीला उपस्थित होते. दंड रकमेच्या नोटिसांचे पुन्हा एकदा अवलोकन करून त्यामध्ये काही प्रमाणात रक्कम कमी करता येईल का?याबाबत चर्चा झाली. सदरच्या दंड रकमा भरण्यासाठी 31 जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे या बैठकीसाठी श्रीवर्धन पर्यटन संस्थेचे बहुतांश सभासद उपस्थित होते.सभेचे आयोजन करण्यासाठी गणेश पोलेकर,निलेश करणेकर,विवेक यादव यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा