कवी मन समूह तृतिय वर्धापनदिन व कवी सुधीर नागले यांच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न...



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
गोरेगाव - दि .११ जानेवारी २०२० रोजी ' कवी मन समूह ' च्या तृतिय वर्धापनदिन ' निमित्त गोरेगाव -रायगड येथील ज्येष्ठ कवी सुधीर नागले यांच्या 'नीलांबर ' या कविता संग्रहाचे प्रकाशन पुणे येथील प्रसिद्ध कवी प्राचार्य सूर्यकांत वैद्य यांच्या शुभहस्ते झाले . या प्रसंगी उपस्थित मान्यवर, रायगड भूषण प्रा .एल् .बी. पाटील, . माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री . दिलीपभाई शेट, अलिबागचे माजी नगराध्यक्ष श्री . सतिष प्रधान, उद्योजक श्री .तानाजी दळवी, उर्दुचे कवी मा . अंजुम अब्बासी, श्री . शांतिलाल मेथा सर, श्री . किशोर प्रधान,  कॉलेजचे प्राचार्य पिंपळापुरे सर, को . म . सा .प. गोरेगाव शाखेचे अध्यक्ष श्री . मंदार म्हशेळकर, श्री . मंगेश पेठे, श्री . सुनिल चिटणीस, ज्येष्ठ कवी श्री . अशोक कदम, डॉ .नंदकुमार मराठे, कवी रमेश कांबळे, वसंत शिगवण, विजय सावंत उपस्थित होते . तसेच या कार्यक्रमांत गोरेगावांतील सन्माननिय नागरीक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .ईश्वर ढोलेसर यांनी केले . तसेच प्रास्ताविक कवी सुनिल चिटणीस यांनी केले व श्री . अशोक कदम , रमेश कांबळे यांनी कवी सुधीर नागले यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या . मनोगत व्यक्त करताना कवी मन समूहातर्फे दरवर्षी समूह सदस्यांपैकी प्रतिभावान व गरजू कवीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा उपक्रम जाहीर केला . या कार्यक्रमाचे नियोजन श्री . मंगेश पेठे यांनी केले .
अध्यक्षीय भाषणानंतर श्री .ढोले सरांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा