श्री लक्ष्मी नारायण जनसेवा ट्रस्ट व डाॅ आर एन पाटील सुरज हाॅस्पीटल सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आजारांवर पंचक्रोशीतील नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबिर..!
मांदाड - ( केशव पिठे ) डॉ. आर. न. पाटील सूरज हॉस्पिटल, सानपाडा व श्री लक्ष्मी नारायण जनसेवा ट्रस्ट मांदाड यांच्या वतीने शनिवार दि. २५ जानेवारी २०२० रोजी, सकाळी १० ते १ वाजेपर्यंत, ग्रुप ग्रामपंचायत सभागृह, मांदाड, ता. तळा, रायगड येथे विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, माणसिक विकार, ह्रुदयविकार, ऑथेपेडिक, ऑडियोमेट्री, एक्सरे, मधुमेह, इसीजी यावर उपचार व मोफत औषधे वाटप करण्यात येनार आहेत. या शिबिरात नामांकित हॉस्पिटल मधिल तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. आणि अनेक आजारांवर उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. तालुक्यातील सर्व गावातील नागरिक यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या गावातील गरजू पर्यंत आरोग्य शिबिराची माहिती जास्तीत जास्त पोहचवा हि नम्र विनंती. अधिक माहिती साठी जितेंद्र चुनेकर - ९६६४१०००४५ या क्रमांकावर संपर्क करा हि विनंती.
إرسال تعليق