तळा : किशोर पितळे
राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ८जानेवारी२०२०रोजी विविध प्रकारच्या मागण्यांंसाठी देशव्यापी संपाचे हत्यार खुपसून संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.गेली अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांसाठी निवेदने देऊनही शासन डोळसपणे पाहत नसल्याने विविध संघटनांनी सामील होण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण देशात संपाची हाक दिली आहे.संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये अंशकालीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा. २०१३चापारीतझालेला(PFRDA)कायदाचीअदयादेश काढून नोव्हेंबर२००५नंतर च्या सेवेत रूजू झालेल्या सेवकांची जुनी पेन्शन योजना बंद करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा.बक्षीसमिती,खंड दुसरा प्रसिद्ध करा.सेवानिवृत्ती वय६०वर्षव५दिवसाचाआठवडा करा अनुकंपा भरती विनाअट करा बेरोजगारी रद्द करून समान कामाला समान वेतन द्या.शिक्षण क्षेत्रातील विना अनुदानित धोरण रद्द करा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारांचे प्रशासकीय स्वरूपाचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा.केंद्राप्रमाणे महागाई, प्रवास भत्ता, शैक्षणिक व होस्टेल भत्ता मिळावा अशा महत्त्वाचा मागण्या असून या देशव्यापी संपातमहाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वयक समिती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सघंटना तळा तालुक्यातील शासकीय निम शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज सकाळी शहरातील बळीचानाका ते तहसील कार्यालय पर्यत मोर्च्चा्का काढण्याआला होता मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन प्रमुख मागण्या बाबत भुषण पाटील यांनी संबोधित केले व मा.तहसीलदार यांना निवेदन सादर केले.अशी माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष भुषण पाटील यांनी दिली
إرسال تعليق