प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे पोलीओ लसीकरणउद्दिष्ट टप्पा पार.


तळा(किशोरपितळे) राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम १९जानेवारी२०२०राबविण्यात आले होते.या वर्षातील पहिलीच मोहीम असून त्यालाउत्तम प्रतिसाद मिळाला. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन तळा तहसीलदार अण्णा म.कनशेट्टी यांनी प्रा.आ.केंद्र तळा येथे आपल्या चिरंजीवाला पल्स पोलीओ डोस पाजून उद्घाटन करण्यात आले.ही मोहीम सार्वजनिक ठिकाणी म्हणजे एस् टी बस स्थानक,ग्रामपंचायत कार्यालय,प्रा.आ.उपकेंद्रात तळेगांव, मांदाड महागांव,
 व मोक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बुथ उभारून
०महीन्यापासून ५वर्षापर्यंत पोलीओ डोस दिला जातो
यावेळी १०५बालकांचे उद्दिष्ट दिले असताना त्या पेक्षा
अधिक बालकांना डोस पाजण्यात आला. शहरातील
एस् टी स्थानकात उद्दिष्ट पूर्ण झाले. प्रतिवर्षी वर्षातून
चार वेळा पोलीओ निर्मूलन करण्यासाठी राबविले जात होते.११५२ चे उद्दीट दिले होते पैकी १०९१ लाभार्थीनी लाभ घेतला सरासरी९१%झाले आहे.या
दरम्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोरेगांवकर यांनी भेटी दिल्या.सद्यस्थितीत संपूर्ण देशातील पोलीओचे निर्मूलन जवळ जवळ समूळ नष्ट झाले आहे त्यामुळे वर्षांत एकदाच राबविण्यात येणार आहे.अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा