म्हसळा तालुका पंचायत समीतीत विविध विभागातील तब्बल १४४ पदे रिक्त

म्हसळा तालुका पंचायत समीतीत विविध विभागातील तब्बल १४४ पदे रिक्त ; किरकोळ कामाना मारायला लागतात अनेक खेटे.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका पंचायत समितीच्या अधित्त्याखाली काम करणाऱ्या विविध विभागांतून १४४ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहीती पुढे आली आहे, पंचायत समिती म्हणजे तालुक्याच्या विकासाचे केंद्र बिंदु असते. पंचायत समिती कार्यालया मध्ये ग्रामीण माणसांची नाळ विविध कामासाठी जुळलेली असते.संबंधीत विभागाचा माणुस उपलब्ध नसल्याने नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात.पंचायत समितीकडे सर्वसामान्य नागरिकांची महत्वाची कामे असतात ती ठरावीक मुदतीत होणे गरजेचे असते. म्हसळा पंचायत समितीत त्याच गोष्टी होत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत.
पंचायत समितीच्या अखत्यारीत असलेले अर्थ, बांधकाम, ग्रा.पा.पुरवठा व आरोग्य ह्या विभागातील कर्मचाऱ्यांची ५० % पदे रिक्त आहेत.उर्वरीत खात्यांमध्ये कृषी वगळता ग्रामविकास खात्याचा ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन,शिक्षण, ए.बा.वि. से. यो.विभागातील ३० ते ३५ % पदे रिक्त आहेत.त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. विषेश म्हणजे या रिक्त जागात आरोग्य व शिक्षण खात्याचा उच्चांक आहे. तालुक्याच्या विविध भागातुन कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकाला याचा मोठा फटका बसत असून त्याचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

जाहिरात
पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील पाच पदे रिक्त आहेत यामुळे घरकुलांचे मोजमाप, बीले, विविध देयके, विविध प्रस्ताव ही कामे वेळेत होत नाहीत. सध्या शहरासह ग्रामीण भागात वातावरण बदलामुळे डेंग्यू,स्वाईन फ्लु , चिकन गुनीया या रोगांची काही प्रमाणांत लागाण व सदृष्य वातावरण आहे थंडी, ताप, खोकला या आजारात वाढ झाली आहे.आरोग्य विभागातील प्रा.आ.कें.म्हसळा ६ ,प्रा.आ.कें मेंदडी ९, प्रा.आ .कें .खामगाव ९ ,जि.प. दवाखाना पाभरे ३ व तालुका आरोग्य विभाग ३ अशी २७ पदे रिक्त आहेत.यामुळे लसीकरण, साथीच्या रोगांचे आजार, यावर वेळेत उपचार होत नाहीत त्यामुळे तालुक्यात आरोग्याच्या अडचणी येतात.

भावी पिढी घडविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा शिक्षण विभागातील तब्बल ७७ जागा रिक्त आहेत, त्यात गट शिक्षण आधिकारी , शालेय पोषण अधिक्षक , विस्तार अधिकारी यासह ६ केंद्र प्रमुख,५ मुख्याध्यापक, ५१ पदवीधर शिक्षक तर११ उपशिक्षकांचा समावेश आहे. यामुळे शाळेवर नियंत्रण राहात नाही, तर याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
पंचायत समितीचा कणा असलेला प्रशासन विभाग. ६, ग्रामपंचायत विभागातील १२ पदे रिक्त आहेत, त्यात ग्रामाविकास अधिकारी(sgsy), ग्रामसेवक ९ पदे रिक्त असल्याने मोठ्या गावासह लहान लहान गावांच्या विकासावर थेट परिणाम होत आहे. दाखले वेळेत न मिळणे, विविध प्रस्ताव देणे या कामांची अडचण होत आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प, जलसंधारण, पशुसंवंर्धन आदी विभागातीलही पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्याच्या विकासावर मोठा परिणाम होत आहे.

" तालुका पंचायत समिती ग्राम विकासाचा महत्वाचा शासनाचा दुवा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य यानी जिल्हा प्रशासन, ग्रामविकास विभाग याकडे पाठपुरावा सातत्याने करणे आवश्यक आहे,यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाकडील अनेक विभागाचा खर्च कमी होण्याचा संभव असतो, विकेंद्रीकरणामुळे पंचायत समितीकडे विकासासाठी मोठया प्रमाणात निधी येत असतो"
महादेव पाटील, माजी सभापती व तालुका प्रमुख, म्हसळा


" पंचायत समितीचे प्रशासकीय कामकाजाचे सिमेंत राहून प्रत्येक महिन्यांत कार्यालयीन कामकाजाचे स्थितीबाबत विविध अहवाल सादर करताना पंचायत समितीच्या रिक्त पदांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी व उप-मुख्य कार्यकारी अधिकारी याना देत असतो"
वाय.एन्.प्रभे, गट विकास अधिकारी पं.स.म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा