म्हसळ्यात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अंनिसचे विविध समाजोपयोगी कार्यक्रम

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) निवासी शिबिराचे खरसई गावात मागील आठ दिवस आयोजन करण्यात आले आहे. या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना वाढत्या वयात अंगमेहनत बरोबरच इतर बौद्धिक व सामाजिक विषयांचे ज्ञान व्हावे या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच उद्देशाने शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हसळा शाखा यांच्या वतीने दि.18 रोजी जिल्हा पदाधिकारी श्री.विनयकुमार सोनवणे यांनी भारत 2020 च्या उंबरठ्या वर या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यान मधे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलेले मिशन  2020, आज आपण  त्या  स्वप्नाच्या  जवळ  आहोत का?, देशाची आजची परिस्थिती, आज देशा समोरील  प्रश्न, जगातील भारताची  प्रतिमा, कोसळत जेडीपी, कलम 370 व वाढती बेरोजगारी, विकसन शील कडून अविकसित कडे भारताची  वाटचाल, आपण  काय करू शकतो, महाग शिक्षण, मोब लिटचिग, धार्मिक तेढ, विद्यार्थी मोर्चे, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली तसेच दिनांक 19 डिसेंबर रोजी श्रीमती नूर खान पठाण व विनयकुमार सोनवणे यांनी चमत्कार  आणि विज्ञान सह प्रयोग कार्यक्रम सादरीकरण करताना चमत्कार आणि त्या मागील विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, अंध श्रद्धा म्हणजे काय, प्रयोगातून पाण्याचा दिवा पेटवणे, मंत्राने अग्नी निर्माण करणे, मनातील विचार ओळखणे, हवेतून सोने काढणे, पाप पुण्यचा हिशोब, कधीही न संपणारे पाणी या विषयांवर सखोल चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर दि.22 डिसेंबर रोजी महा अंनिसच्या राज्य पदाधिकारी आरती नाईक यांनी जोडी दाराची  विवेकी निवड या विषयावर कार्यशाळा घेतली. याावंए
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेम व आकर्षण, विवाह, कुंडली पत्रिका, जोडीदार निवड निकष, विवाह संस्था या सर्व बाबींबाबत विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने बोलते करून अंतर्मुख करून महाअंनिस ची जोडीदाराची विवेकी निवड बाबत पंच सूत्री तसेच विवेक वाहिनी या बाबत माहिती दिली. 
राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विविध सामाजिक व समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून महा अंनिस चे आभार मानले.
निवासी शिबिरात अंनिस चे प्रबोधन कार्यक्रम आणि  मार्गदर्शन या मुळे म्हसळा शाखेला अनेक नवीन  सक्रिय विद्यार्थी सभासद मिळाले. व अनेक विद्यार्थ्यांनी महा अंनिसचे आणि विवेक वाहिनीचे  विवेकी काम करण्याची तयारी दाखवली असल्याचे कार्याध्यक्ष किशोर मोहिते यांनी सांगितले. 
  यावेळी या शिबिरात महा अंनिस चे म्हसळा शाखा कार्याध्यक्ष किशोर मोहिते, पदाधिकारी महेंद्र नाईक, शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बेंद्रे सर, प्रा.जाधव सर यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा