प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुका सार्वञानिक वाचनालयांत महात्मा ज्योतिबा फुले यांची १२९वी पुण्यतिथी आज साजरी झाली. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, ता.कृ.अधिकारी डी.डी. अनाप, प्रमोद गायकवाड, व्ही.जी. सोनावणे,आर.एस. मांडवडे, जे.के.दुसार, व्हि.एन.भदाणे, एन.आर. घेवारे, ग्रंथपाल उदय करडे.,श्रीमती व्हि.आर.कलबासकर, डी.व्ही. पालवे, पी.बी.केदार, के.पी. शेळके, प्रगती केदार, आर.व्ही. पाटील, सायली चोगले, धनश्री नाक्ती आदी कर्मचारी व मान्य वर उपस्थित होते.बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारणे बाबत काम केले.
"विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।"
महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या ओळींनी संपुर्ण महाराष्ट्रात क्रांती करीत अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले आसल्या बाबत मान्यवरानी माहीती दिली.
إرسال تعليق