संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यातील पाभरे येथील सुरेश(अण्णा) नांदगावकर ( रिक्षावाला) ह्यांचे सोम. दि. ४ रोजी रात्री उपचारा दरम्यान हृदय विकाराचे तीव्र झटक्याने वयाचे ४८व्या वर्षी निधन झाले. म्हसळा येथे छातीत दुखायला लागले म्हणून स्थानिक १-२ डॉक्टरांकडे इलाज करून पुढील उपचारासाठी महाड येथे नेले असता त्यांचे रुग्णालयांत उपचारादरम्यान निधन झाल्याचे समजते.म्हसळा शहरात रिक्षा लाईनमध्ये रिक्षावाला सुरेश (अण्णा) या टोपण नावानेच बहुधा ओळखले जायचे , त्यांच्या पश्चात पत्नी, दोन २ मुली व १ मुलगा असा परीवार आहे.
إرسال تعليق