म्हसळा पोलीस स्टेशनच्या शांतता सभेत पोलीसांचा निषेध करून नागरिकांनी केला सभात्याग.


हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावरील कारवाईचा केला निषेध.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतींनिधी
आयोध्येतील बाबरी मशीद व राम जन्मभूमी प्रकरणी प्रलंबित खटल्याचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.10 नोव्हेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद आणि 12 नोव्हेंबर रोजी येणारी गुरुनानक जयंती हे सण येत असल्याने म्हसळा तालुक्यात सर्वधर्मीय शांतता आबाधीत राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी शांतता सभा उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार यांच्या अध्यक्षते खाली होती परंतु सभेत म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर होणाऱ्या मुंबई पोलीस अधिनियम कलम ११० प्रमाणे म्हसळा पोलीसानी केलेल्या कारवाई बाबत चर्चा होऊन उपस्थित सर्व धर्मिय मंडळीनी पोलीसांचा निषेध नोंदवून सभात्याग केला.
श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा पोलिस ठाण्याच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीला म्हसळा पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर,नायब तहसिलदार के.टि.भिंगारे,पोलिस उप निरीक्षक दिपक डूस,चौर्‍यांषी गाव हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष महादेव पाटील,म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुभाष उर्फ भाऊ करडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबजान पठाण,माजी सभापती रवींद्र लाड,राष्ट्रवादीचे उपतालुका अध्यक्ष शाहिद उकये, शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना पानसारे,व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार सावंत,कांतीलाल जैन, बाबू बनकर , हेमंत नाक्ती,यांच्यासहित अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शांताता समितीची सभा सुरू होताच चौर्‍यांषी गाव हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर मंगळवारी पोलिसांनी केलेली कारवाईचा चुकीच्या पद्धतीची असल्याचे सांगून उपस्थितांनी निषेध नोंदवला.माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा नगरसेवक बाबजान पठाण, बाळशेठ करडे, रवींद्र लाड यानी पाटील यांच्या बाबत सकारात्मक मत मांडताना महादेव पाटील व आम्ही नेहमी पोलिसांना सहकार्य करत आलो आहोत, यापुढेही सहकार्य करत राहणार.मात्र महादेव पाटील यांच्यावर कारवाई करताना समाजातील वरिष्ठ मंडळींना समोर बोलाऊन अश्याप्रकारची कारवाई करायला हवी होती असे सांगितले.यावेळी उपस्थित सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते,सर्व समाजाचे ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी चौर्‍यांषी गाव हिंदू संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवत शांतता समितीच्या सभेतून सभा त्याग केल्याने ही सभा सुरू होण्या आधीच संपुष्टात आल्याने म्हसळा पोलीसांची केवील वाणी स्थिती झाली.

 
शांतता सभेत मनोगत व्यक्त करताना म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील.


पोलिस विभागाकडून कोणतीही नियमबाह्य कारवाई करण्यात येत नाही.म्हसळा तालुक्यात सणासुदीच्या काळात कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शांतात आबाधीत राहण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे 
-बापूराव पवार,उपविभागीय पोलिस अधिकारी,श्रीवर्धन 


 सभात्याग करताना उपस्थित नागरिक

 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा