श्रीवर्धन येथे भातशेतीचे पंचनामे.

प्रतिनिधी श्रीवर्धन
परतीचा पाऊस व क्यार वादळाने शेतकऱ्याचे झालेले अतोनात नुकसान  व त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रीवर्धन तहसीलदार यांनी भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीवर्धन परीसरातील तयार झालेले भातपीक पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची माहीती घेण्यासाठी श्रीवर्धन प्रशासनांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व झालेल्या नुकसानीची माहीती घेतली.

यावेळी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक संपुर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर  उपासमारीची पाळी येणार असून उन्हाळ्यात गुरांच्या चा-या अभावी गुरे कशी जगवायची हा प्रश्नसुध्दा शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांची अवस्था यावेळी खुपच बिकट बनली असल्याने त्यांना या अवस्थेत आधार मिळावा म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.

यावेळी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन केले की आपल्या भात, नाचणी, वरी या पीकांचे जे काही नुकसान झाले असेल त्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,यांच्याशी संपर्क साधुन लवकरात लवकर आपल्या नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावे. सदर पंचनाम्यासाठी उप विभागीय आधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी सुनील मोरे, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल इत्यादी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा