संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील वारळ येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याने तारेने फास लाऊन आत्महत्या केल्याचे घटनेची नोंद म्हसळा पोलीसांत करण्यात आली आहे. दयानंद लक्ष्मण कवीळकर याने गावातील स्मशानभूमी शेजारील सत्तार पेशमाम यांच्या कंपाऊंड मधील भेंडीच्या झाडाला तार बांधून स्वताच तारेने गळयाला फासकी लाऊन आत्महत्या केल्याची नोंद म्हसळा पोलीसानी केली आहे.आश्विनी हरीबा पाटील ( मृताची बहीण ) वय ४५ हिने दिलेल्या फिर्यादीवरून अ.मृ.र.नं.१८ /२०१९ C.R.P.C.१७४ प्रमाणे म्हसळा पोलीसानी घटनेची नोंद केली आहे. दयानंदने घरगुती वाद ,व्यसनाधिनता व नैराश्यातून आत्महत्या केली असावी असे तपासी अंमलदार म.पो.ह.छाया रामप्रभू कोपनर (ब.नं.१०२)यांचा अंदाज आहे.दयानंद हा गावातच राहून शेती व शेत मजुरी करीत असे त्यातच कुटुंबात आई, पत्नी व ३ मुले असा परिवार आसल्याने तो सतत आर्थिक विवंचनेत आसल्याने त्यानी आत्महत्या केली असावी असा अंदाज स्थानिक मंडळी वर्तवीत आहेत.
إرسال تعليق