फोटो: बालदीना निमीत्त विद्यार्थी रिन्हान करडे याचा सत्कार करताना ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालय वाचन चळवळ या सत्राखाली विविध उपक्रम राबवित असताना आज बालदिना निमीत्त ग्रंथालय म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते, पुस्तके, ग्रंथ व अन्य वाचनीय साहीत्य कसे उपलब्ध केले जाते , त्यांची देवाण घेवाण , वाचन चळवळीची विद्यार्थी जिवनात महत्त्व कसे? या विषयी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूरच्या न्यू इंग्लीश स्कूल, म्हसळाच्या विद्यार्थाना वाचनालयाने परिपूर्ण माहीती दिली. यावेळी शिक्षीका श्रीमती सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे तसेच इयत्ता ७ वी चे विद्यार्थी बालदिनाचे निमित्ताने ग्रंथालय भेट या उपक्रमा निमीत्त आले होते. यावेळी श्रीमती सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे यांचे हस्ते लोकमान्य टिळक व पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.'ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे,सायली चोगले, धनश्री नाक्ती, यानी ग्रंथालय निर्मिती ते वाचक चळवळ या ग्रंथालयाचे सर्व घटकाची परिपूर्ण माहीती दिली. यावेळी ईश्वरी बनकर, निधी गावडे, समीरीन शहा व अन्य विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकाचे ग्रंथपाल उदय करडे व लिपीक धनश्री नाक्ती यानी निरसन केले.
إرسال تعليق