संत गोरा कुंभार समाज नवरात्रौत्सव मंडळाचे २६ व्या वर्षात पदार्पण


म्हसळा प्रतिनिधी
म्हसळ्यातील संतगोरा कुंभार नवरात्रौत्सव , सांस्कृतिक , सामाजिक , क्रीडा मंडळ कुंभार समाज मंडळाने यावर्षी २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे . आनंदी , उत्साही आणि रोजच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने याही वर्षीचा नवरात्रौत्सव संपन्न होत आहे . या मंडळाची स्थापना सन १९९३ मध्ये म्हसळा येथील कुंभार आळी येथे झाली . कुंभार आळीत विविध जाती - धर्माचे लोक राहतात ; परंतु कुंभार समाजाकडून या सर्व जाती - धर्माच्या लोकांना मोठ्या प्रेमाने , आपुलकीने सामावून घेऊन त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातो . गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील एक तरुण व्यावसायिक आणि सर्वांना सामावून घेण्याची कला असणाऱ्या सुनील भिकू अंजर्लेकर यांच्याकडे या समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा आहे आणि ती त्यांनी आजपर्यंत यशस्वीपणे सांभाळून म्हसळा तालुका कुंभार समाजाचा लौकिक केवळ म्हसळ्यापुरता मर्यादित ठेवता संपूर्ण रायगडमध्ये तेवत ठेवला आहे . सुनील अंजर्लेकर यांच्याकडे रायगड जिल्हा कुंभार समाजाचे खजिनदार पद असून हे पदही एक सामाजिक बांधिलकी म्हणून यशस्वीरित्या सांभाळत आहेत . शासन दरबारी असणाऱ्या समस्या समाज संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे . रायगड जिल्हा कुंभार समाज उपाध्यक्ष नंदकुमार गोविलकर मुंबई कमिटीचे अध्यक्ष शशिकांत पाभरेकर , सचिव गजानन चेऊलकर , खजिनदार जनार्दन अंजर्लेकर शिक्षण कमिटी अध्यक्ष जितेंद्र पाभरेकर , सोशल मीडिया अध्यक्ष गजानन पंदिरकर , स्थानिक कमिटी उपाध्यक्ष दिनेश म्हशिलकार , सचिव सुजित बोरकर , सहसचिव संतोष कुडेकर , खजिनदार गणेश बिरवाडकर , श्रीवर्धन-म्हसळा युवक अध्यक्ष अभय कलमकर , महिला अध्यक्षा वासंती म्हशीलकार , उपाध्यक्षा शालिनी गोविलकर , स्थानिक उपाध्यक्ष हरिश्चंद्र गोविलकर स्थानिक कमिटी खजिनदार गणेश बिरवाडकर , निलेश परबळकर आणि संपूर्ण समाजबांधव यांचे फार मोठे सहकार्य लाभते . अंबामाता आगमन व पूजन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम , भजन संध्या , फनी गेम्स, होम - हवन , महाप्रसाद , महिलांचा भोंडला कार्यक्रम श्री सत्यनारायण महापूजा , विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नऊ दिवस महिलांचा नियमित भजन व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . नावरात्रौत्सवाच्या काळात माजी नगराध्यक्षा कविता बोरकर , विद्यमान उपनगराध्यक्ष संजय कर्णिक आणि सर्व मान्यवर कमिटी व समाजबांधव उपस्थित होते . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा