पहील्या फेरी पासून लीड घेत राष्ट्रवादीच्या आदीती तटकरेनी बाबांचा मोडला रेकॉर्ड



पहिल्या फेरीपासून सुरु झालेली आघाडी सेनेच्या घोसाळकराना तोडताच आली नाही

संजय खांबेटे ; म्हसळा  प्रतिनिधी

१९३ श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार _ खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या रा. जि.प. अध्यक्षा अदिती तटकरे यांनी शिवसेनेचे उपनेते तथा म्हाडाचे सभापतीं विनोद घोसाळकर यांचा तब्बल  ३९ हजार ६२१ मताधीक्याने पराभव करीत श्रीवर्धन मतदार संघ हा राष्ट्रवादींचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. यापूर्वी विनोद घोसाळकर यांचा दोन वेळा खासदार तटकरे यानी पराभव केला होता. घोसाळकरांसाठी या निवड़णुकीदरम्यान शिवसेनेने या मतदार संघात आदेश बांदेकर, रामदास आठवले या दिग्गजांसहीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील मोठी सभा झाली होती. पहिल्या फेरीपासून सुरु झालेली आदिती तटकरे यांची आघाडी कायम राहत २६ व्या फेरीअखेर ३९ हजार ६२१ मतांची आघाडी घेतल्यावरच थांबली.गेल्या दहा वर्षांपासून सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन मतदार संघात केलेल्या विकासाची पोच पावतीच श्रीवर्धन करांनी अदिती तटकरेंच्या या मोठ्या विजयाने दिली व श्रीवर्धन चा मतदार हा विकासा चा निष्ठावंत मतदार असल्याचे दाखवून दिले.

श्रीवर्धन मतदार संघात बसपाच्या सुमन ७७७, मनसेचे संजय गायकवाड १४७३, मुस्लीम लीगचे अकमल कादीरी ३३०, बहुजन मुक्ती पार्टीचे रामभाऊ मंचेकर २८१ अशी केवळ २८६१ मते व ७ अपक्षानी ५९६७ मते घेतली. मुस्लीम बाहुल्य असलेल्या या मतदार संघात तब्बल ४ मुस्लीम उमेदवार होते त्याना केवळ २२३१ मते देऊन मतदार संघातील मुस्लीम मतदार तटकरेंच्या राष्ट्रवादीचेच निष्ठावंत असल्याचे सिध्द केले.

रायगड लोकसभा मतदार संघातील श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती तटकरे यानी प्रचंड मताधिक्क घेतले असले तरी उर्वरीत दापोली , गुहागर, महाड व अलिबाग ( शिवसेना ) पेण ( भाजपा ) अशी निवड झाल्याने खासदार सुनील तटकरे याना भविष्यात राजकीय गणिते सोडवावी लागणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा