संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील मुख्य लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती तटकरे व शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्यात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून मागील लोकसभा निवडणुकीतील श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील खासदार सुनील तटकरे यानी घेतलेली मतांची आघाडी ही केवळ जमेची बाजू आहे, परंतु अधाडीत बिघाडी झाली असतानाच श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचे भगवे वादळ घोंगावाला लागले आहे.युतीतील शिवसेना, भाजपा, रिपब्लीकन पक्ष (आ )एक दिलाने प्रचाराला लागली आहे. म्हसळयात शुकवार दि. ११ रोजी दुपारी १ वाजता मा.केंद्रीय मंत्री अनंतजी गीते साहेब, भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांची शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्री. विनोद घोसाळकर यांचे प्रचारासाठी तोफ धडाडणार आहे. यावेळी श्रीवर्धनचे माजी आमदार.श्री.अवधुत तटकरे,जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कॄष्णा कोबनाक ह्यांचे मतदाराना मार्गदर्शन होणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील यानी सांगितले.तालुक्यात युतीतील शिवसेना, भाजपा, रिपब्लीकन (आ) गटाने प्रचारांत आघाडी घेतली आहे, मतदान केंद्र, गाव, वाड्यांवर बैठका भेटींचे आयोजन करण्यात प्रचारावर भर दिला आसल्याचे पाटील यानी सांगितले.
إرسال تعليق