आशा रणखांबे जिल्हास्तरीय स्त्री शक्ती सन्मान पुरस्कारने सन्मानित

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
गर्जा कट्टा क्र.७ गर्जा स्टुडीओ मुरबाड येथे दिपोत्सव हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
        जिल्हास्तरीय स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार आशा रणखांबे यांना पत्रकारिता या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  गर्जा कलामंच मुरबाड यांनी  स्त्री शक्ती , महिला सक्षमीकरण उपक्रमा अंतर्गत , विशेष   गर्जा कट्टा क्र.७  दिपोत्सव या विशेष कार्यक्रमात  निर्माते /गायक प्रफुल्ल अशोक मोरे यांच्या शुभ हस्ते  देऊन सन्मान  नुकताच केला गेला.
यावेळी गर्जा कलामंचचे अध्यक्ष नितेश डोंगरे, मंगल डोंगरे, गर्जा कलामंचचे प्रसिद्धी प्रमुख दीपक आंबटकर , गर्जा कलामंच सदस्य , विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक, कलावंत,  रसिकजन आणि विविधक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
      पत्रकार आशा रणखांबे यांना मिळालेल्या  पुरस्कारामुळे  संपादक गजानन मोहिते, संपादक रफिक घाची ,  संपादक रमेश पोटले, संपादक सतिश सोनावणे, संपादक संतोष चव्हाण, संपादक दिलीप बनसोडे , पत्रकार मिलिंद जाधव आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. विविध माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
      " माझा हा पहिलाच पत्रकारिता मधील  पुरस्कार सन्मान आहे. या पुरस्कारने सन्मानित केल्यामुळे माझा उत्साह पहिल्यापेक्षा जास्त वाढला आहे. " असे मत पुरस्कार मिळाल्या नंतर आशा रणखांबे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा