चॅम्पियन्स कराटे स्पर्धेत विक्रांत खांडेकर याला गोल्ड मेडल


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   तिसरी चॅम्पियन्स कराटे लीग पुणे येथे संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच गाणी गावचे सुपुत्र विश्वास खांडेकर यांचे सुपुत्र कु.विक्रांत विश्वास खांडेकर याने कराटे (काता) गोल्ड मेडल व कुमिती (फाईट) या दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये मिळविले आहे. शालेय शिक्षणाबरोबरच कमी वयात कराटे खेळाची आवड असलेला विक्रांत याने याआधीही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन विविध प्रकारचे मेडल व बक्षिसे प्राप्त करून आपल्या आईवडिलांचे, गुरुजनांचे, गावाचे नावलौकिक केले आहे. विक्रांत च्या या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक गोल्ड मेडल व बक्षीस मिळविण्यासाठी कराटेचे गुरू अविनाश मोरे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याचे विक्रांत चे वडील विश्वास खांडेकर यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा