खरसईच्या रामचंद्र बुवांचा "रायगड भूषण" पुरस्काराने सन्मान



( म्हसळा प्रतिनिधी )

सामाजिक क्षेत्रात विशेष नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा रायगड जिल्हा परिषदे मार्फत दिला जाणारा मानाचा " रायगड भूषण" पुरस्काराने सन्मान करण्याची परंपरा आहे. या वर्षी म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे सुपुत्र व सामाजिक कायकर्ते रामचंद्र गजानन म्हात्रे यांचा सन्मान होणार आहे. ते विद्यार्थीदशेपासूनच ग्रंथ वाचन, अधात्म्य, निरुपण हे आवडीने करीत असत. कलापथकाची स्थापना आदी व सामाजिक, धार्मिक , सांस्कृतीक कामाची पडताळणी करुन त्याना रायगड जिल्हा परिषदे मार्फत दिला जाणारा मानाचा " रायगड भूषण" पुरस्काराने बुधवार दि. ११ सप्टें. रोजी अलिबाग येथे सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानी कलापथका व्दारे अंधश्रद्धा, आरोग्य, शिक्षण या विषयी स्वत: काव्य, पोवाडे रचून पथनाटय सादर करुन मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यानी "जन्म मृत्यू " हे नाटक लिहीले असून , कलावंत व दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहे.अनेक सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक , सदस्य असलेले म्हात्रे श्रीवर्धन मतदारसंघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, माणगाव या भागात " रामचंद्र बुवां" म्हणून परिचीत व प्रसिद्ध आहेत. या सर्व तालुक्यांतील गावांतून शौकीन, सामाजिक, राजकीय मंडळीतून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा