गणेश - गौरी विसर्जन वेळेत करावे नागरिकाना पोलीसांचे अवाहन



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरासह तालुक्यात १२७९ गणपती व १४१ गौरींचे आज शनिवार (दि. ७) हा विसर्जनाचा दिवस आहे.तालुक्यांत आजपर्यंत ४४९९ मि.मि. पाऊस झाला आहे. म्हसळा शहरांत सकलप (संगम),सावर पूल संगम, व हिंगूळ डोह या तीन ठिकाणी विसर्जन होते.तालुक्यातील बहुतांश विसर्जन खाडी, नदी, तलाव व वीहीरींत होत असते. प्रचंड पावसामुळे नदी, तलाव व वीहीरीं तुडुंब भरल्या आहेत. तर सायंकाळी ६ नंतर राजपुरी खाडी लगतच्या तुरूंबाडी, काळसुरी, वारळ, मेंदडी, खरसई, म्हसळा, खारगाव (खु ), खारगाव ( बु), पाभरे, निगडी, कांदळवाडा, वाशी या भागात उधान येण्याची भिती आहे. सर्व नागरिक व गणेश भक्तानी कृपया सुर्यास्ता पूर्वी विसर्जन करावे असे आवाहन म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यानी केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा