प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सन २०१८-१९ चा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील पाभरे गटात काळसुरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. काळसुरी ग्रामपंचायत हद्दीतील घरे, परिसर स्वछ व सुंदर ठेवून जीवनमान व आरोग्यमान उंचावण्यासाठी समस्थ गावकऱ्यांनी केलेला प्रयत्न यामुळेच गावाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे गावातील प्रतिष्ठित मान्यवर सांगतात. मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पन्नास हजार व सन्मानचिन्ह असे आहे.

إرسال تعليق