अनंत चतुर्थीला बाप्पा च्या निरोपासाठी श्रीवर्धनकरांची लगबग ; शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन सज्ज




श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या निरोपाची तयारी करण्यासाठी श्रीवर्धन मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व सर्वसामान्य जनता यांनी जोरदार तयारी केली आहे .श्रीवर्धन मधील बाजारात  नैवेद्य व उत्सव समाप्ती साठी लागणाऱ्या साहित्यासाठी लोकांची गर्दी वाढलेली आहे .उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन व मिरवणुकीसाठी  पोलीस प्रशासना कडून योग्य दक्षता घेण्यात येत आहे .श्रीवर्धन पोलीस दल व अतिरिक्त पोलीस यांची नेमणूक मिरवणुकीसाठी करण्यात आली आहे .होमगार्ड , रेल्वे पोलीस व स्थानिक दल असे 40 कर्मचारी व 03 अधिकारी यांचा ताफा सुरक्षेसाठी नियुक्त केला  आहे .श्रीवर्धन नगरपरिषदेने निर्मल्यासाठी समुद्र किनाऱ्यावर विविध ठिकाणी भव्य कचरा पेट्यांची स्थापना केली आहे .नगरपरिषदेच्या जीवरक्षक वर्गाला सकाळ पासून ते विसर्जन होऊ पर्यंत थांबण्याचे आदेश मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या कडून देण्यात आले आहेत .नगरपरिषदेची स्वच्छते साठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे .गणेश मिरवणूक दरम्यान गणेश भक्तांना वाहतुकीसाठी त्रास होऊ नये या साठी श्रीवर्धन शहरातील एस टी वाहतुक सायंकाळी बंद ठेवण्यात आली आहे .श्रीवर्धन शहरात 03 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत .श्रीवर्धन एस टी स्टँड मार्गे शिवाजी चौक , सोमजाई मंदिर , आंबेडकर चौक , ते श्रीवर्धन समुद्र किनारा असा मिरवणुकीचा नियोजित मार्ग ठरवण्यात आला आहे .




गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठे ही गैर प्रकार होऊ नये या साठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .अतिरिक्त पोलीस दल श्रीवर्धन मध्ये तैनात करण्यात आले आहे .जनतेने शांततेत उत्सव साजरा करावा असे आव्हान पोलीस प्रशासना कडून करण्यात येत आहे . .....प्रमोद बाबर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )

समुद्र किनाऱ्यावर नगरपरिषदे कडून स्वच्छक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे  .प्रत्येक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरता काळासाठी निर्माण केलेल्या कचरा पेटी ठेवण्यात आल्या आहेत .विसर्जना नंतर समुद्र किनारा स्वच्छ दिसावा यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे ....किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )

श्रीवर्धन मधील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकी बघण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पर्यटक येतात त्या दृष्टीने  नगरपरिषदे ने योग्य रचनात्मक व्यवस्था निर्माण केली आहे .नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत .......जितेंद्र सातनाक (प्रभारी नगराध्यक्ष श्रीवर्धन )


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा