कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या समन्व्य समितीची मीटिंग संपन्न.


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
कलगीतुरा  समाज  उन्नती मंडळ मुंबई संलग्न समन्व्य समिती यांची संयुक्त मिटिंग नुकतीच मंगल कार्यालय ता.लांजा जिल्हा रत्नागिरी येथे श्री अनंतजी तांबे साहेब यांच्या अध्यक्षते  खाली संपन्न  झाली सदर मिटिंगसाठी  सर्व पदाधिकारी हजर राहिल्या बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच लांजा मंडळांनी सभेचे उत्तम नियोजन आणि भोजनाची उत्तम सोय आणि सर्वांचा सन्मान केल्याबाद्दल मंडळाचे आणि पदाधिकारी यांचे समितीच्या वतीने विशेष आभार मानले.
सदर मिटिंग मध्ये खालील निर्णय घेण्यात आले.
१) समन्वय समितीच्या वर्ष्यातून दोन सभा घेतल्या जातील तिचेच  पुढील सभा राजापूर येथे रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी नियोजित केली आहे याची सर्व पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी.
२)  अश्लिल गाणी अथवा कविता /कवण सादर केल्यास त्या शाहिराला ३ वर्ष निलंबित करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते करण्यात आला 
३) वंशावळी पुस्तक  छापण्यात येणार आहे सदर पुस्तक छापण्याचे  सर्व जबाबदारी/ नियोजन सर्व मंडळाच्या अध्यक्ष यांच्यावर देण्यात आली आहे.
४ ) समन्वय समिती वर  मुंबई मंडळाचे सदस्य  शाहीर भारदे गुरुजी आणि  श्री अनंत यलमकर तर महाड मंडळाचे शाहीर तुकाराम मानकर आणि श्री रामचंद्र म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली.
५ ) शाहीर राजाराम रणपिसे / संजय निंबाळकर  यांच्या सोबत समन्वासमिती संलग्न मंडळ  पासधारक यांनी वरील शाहिरांशी कार्यक्रम करू नयेत.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा