म्हसळा प्रतिनिधी
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघासह म्हसळा तालुक्यात शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री खासदार अनंत गीते यांची झालेली पिछेहाट मोठया फरकाने झाली, होते. त्याच वेळी सेनेच्या नेत्यानी गांभीर्याने दखल घेत जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुखांचे तडकाफडकी राजीनामे घेतले होते. म्हसळा तालुका प्रमुख नंदू शिर्के यांचे रिक्त जागी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आदेशाने,कोकणचे नेते व संपर्क प्रमुख ना.सुभाष देसाई,सेना नेते अनंत गीते,संपर्क प्रमुख श्री थरवळ यांचे शिफारशीने नवीन व अनुभवी नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देताना म्हसळा शिवसेना तालुका प्रमुखपदी म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.महादेव पाटील यांचे सह माणगाव तालुका प्रमुखपदी गजानन अधिकारी आणि तळा तालुका प्रमुख पदी प्रधुम्न ठसाळ यांची निवड करण्यात आली आहे.
महादेव पाटील यांनी म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख पदावर निवड झाल्यावर मनोगत व्यक्त करताना शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि नेते गण यांचे आभार मानले.तालुका प्रमुख म्हणुन मी पक्ष संघटनेत सर्वांना बरोबर घेवुन निष्ठेने काम करेल तसेच तालुक्यात शिवसेनेला उभारी देण्यासाठी माझा यशस्वी प्रयत्न असेल.म्हसळा तालुका प्रमुख पदासाठी महादेव पाटील यांची निवड झाल्याने तालुका शिवसैनिकांत नवचैतन्य आले आहे.म्हसळा तालुका प्रमुख महादेव पाटील यांच्याकडे अनेक वर्षाचासामाजिक,राजकीय, शासकीय कामांचा गाडा अनुभव व अभ्यास आसुन त्यांनी तालुक्यात तीन वेळा सभापती,उपसभापती,जिल्हा परिषदेचे सदस्य, सरपंच पद भूषविले आहे.म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे जिल्हा व तालुका स्तरावर शिवसेनेतून अभिनंदन होत आहे.


إرسال تعليق