श्रीवर्धन : भारत चोगले
रायगड जिल्ह्यात सागरी महामार्गाला बॅ . अंतुले यांचे नाव देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धनमध्ये बोलताना सांगितले. श्रीवर्धन शहरातील विविध विकास कामांचे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सुमारे ४ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन , उद्घाटन व लोकार्पण सोहळा करण्यात आला. त्यानंतर श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्र . १ चे सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा . तटकरे म्हणाले , आपण पुरगस्त भागांची पहाणी केली आहे . रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले . पावसाच्या महापुराने नागरिकांची घरे सुध्दा पडलेली आहेत . शेतकऱ्यांची शेती वाहुन गेली आहेत . काही लोक बेघर झाले आहेत . त्यांना सरकाराने मदत केली पाहिजेत . परंतु हे सरकार त्याची चेष्टा करीत आहे . सरकारचे म्हणणे आहे की , पूराचे पाणी ४८ तास घरामध्ये असेल त्या पूरगस्त लोकांना मदत करता येणार आहे , हे चुकीचे आहे . यावेळी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे , उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक , डॉ . अब्दुल कादिर कासीम राऊत , जिल्हा परिषद सदस्या प्रगती अदावडे , श्रीवर्धन नगरपालिका नगरसेवक वसंत यादव , बाळकृष्ण चाचले , किरण केळकर , अनंत गुरव तसेच कार्यकर्ते व श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक , त्याचप्रमाणे श्रीवर्धन नगरपरिषद हद्दिमधील सर्व शाळांमधील शिक्षक - शिक्षिका , विद्यार्थी विद्यार्थीनी यांची मोठी उपस्थिती होती . खा . तटकरे पुढे म्हणाले आपण रायगडचे पालकमंत्री असताना रायगड जिल्ह्यात महापूर आला . काही ठिकाणी दरड कोसळली अशा ठिकाणी तातडीने मदत केली होती . शिवाय तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना सहकार्य करण्याचे काम केले गेले . आताच्या सरकारने वेगळाच फतवा काढला आहे . यामुळे या सरकारने पूरगस्त लोकांच्या भावानांशी खेळू नये असेही तेम्हणाले . आपण रायगड जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत . तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून एकेरी २० हजार रूपयांची आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करत आहे . दरम्यान रायगडातील मच्छिमारांबद्दल बोलताना ते म्हणाले , जिल्ह्यात मच्छिमाराच्या संस्था एकत्रित आणून त्यांना मत्स्यव्यवसाय व कृषीखात्यातील योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न राहणार आहे . तसेच रायगड जिल्ह्यात मध्यवर्तीय ठिकाणी कोल्डस्टोअरेज कसे उभारता येईल याकडे आपण प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
वडवली गाव दत्तक
मागच्या वेळी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गाव हे एका खासदारांनी दत्तक घेतले होते . परंतु या गावाचा विकास त्यांना करता आला नाही . विकास करण्यासाठी मानसिकता असावी लागते . एका खासदाराने घेतलेले दत्तक गाव पुन्हा कोणाला घेता येत नाही . यामुळे आपण आता श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गाव विकसित करण्यासाठी घेतले आहे . आगामी काळात वडवली गावामध्ये विकास कामे केली जाणार असून महाराष्ट्र राज्यात वडवली एक आदर्श गाव म्हणून गणले जाणार असल्याची ग्वाही खासदार तटकरे यांनी यावेळी दिली .



إرسال تعليق