म्हसळा येथे विद्यार्थासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन


(म्हसळा -प्रतिनिधी)

जनसंकल्प प्रतिष्ठान म्हसळा या सामाजिक संस्थेद्वारे तालुक्या तील इयत्ता 10 वी,12 वी आणि पदवीधर विद्यार्थ्यना त्यांचे भावी काळात बँकिंग, एमपीएससी,यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षाना सामोरे जाण्यासाठी आणि अशा परीक्षा व अभ्यासाची आवड निर्माण व्हावी या स्तुत्य हेतूने मोफत करिअर सेमिनारचे दिनांक 10 ऑगस्ट 2019 रोजी कुणबी हॉल येथे सकाळी 10 वाजता  आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी जनसंकल्प प्रतिष्ठान म्हसळा तर्फे गुणवान विद्यार्थाचे गौरव करण्यात येणार आहे. मोफत सेमिनारमध्ये प्रा.विकास सावंत आणि राजकीय,सामाजिक,उद्योग क्षेत्रात करिअर केलेले समाजसेवक कृष्णा कोबनाक व विविध क्षेत्रातील तज्ञ  मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनार करिता म्हसळा तालुक्यातून 250 विद्यार्थांनी त्यांची नावे नोंद केली आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा