म्हसळेकर येणाऱ्या सर्व सणांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखणार


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे येणाऱ्या सणांच्या अनुषंगाने कार्यकारी इंडाधिकारी व पोलीस निरीक्षक यानी तहसीलदार म्हसळा यांच्या दालनात नायब तहसीलदार के.टी. भींगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या शांतता सभेत हिंदू व मुस्लीम समाजाचे म्हसळाकर बांधवानी येणाऱ्या नागपंचमी, बकरी ईद , नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन,गोपाळकाला, गणेश चतुर्थी या सर्व सणांत शांतता व सुव्यवस्था राखणार असून कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करू अशी ग्वाही दिली.यावेळी
पो.निरीक्षक परशुराम कांबळे, PSI दिपक डूस, सभापती छाया म्हात्रे, समन्वय समीती अध्यक्ष शैलेश पटेल, उपसभापती संदीप चाचले, हिंदू समाज अध्यक्ष सुभाष करडे, मंगेश म्हशीलकर, मुस्लीम जमात अध्यक्ष महमद अली पेणकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, रणजीत शेठ जैन,सलीम चोगुले, बाबू शिर्के, अशोक काते, बाबाजान पठाण,सुनील उमरोठकर, तुकाराम पाटील, नंदकुमार गोविलकर, समीर चोगले, अनंत पाटील, नासीर मिठागरे, कांती भाऊ जैन, योगेश करडे , राजू लाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एस.टी.थांबे(बसस्टॉप), ऊनाड गुरे, अनधिकृत व बेशीस्त पार्कींग, विविध रस्त्यांचे खड्डे, सातत्याने विद्युत प्रवाह खंडीत होणे या बाबत उपस्थितानी आभ्यासू . मुद्दे चर्चेला आणले, म.रा. वि. वितरण कंपनीचे नव्याने रुजू झालेले उप कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यानी अत्यंत अभ्यासूपणे काम सुरू केले आहे व पुढील देखभालीचे काम लौकरच करणार आसल्याची हमी दिली. त्यामुळे सभागृहाने त्यांचे विशेष कौतुक केले.



"बकरी ईद संदर्भात आम्ही केंद्र व राज्य शासनाचे परिपत्रक व धोरणानुसार कुर्बानीचे नियमांचे पालन करणार आहोत तसे १९ गावामधून कळविले आहे. चुकीचे वर्तन कोणी केल्यास संबधीत व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी"
अहमद अली पेणकर, अध्यक्ष मुस्लीम समाज.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा