आदर्श शाळा खरसईने राखली सामाजिक बांधिलकी



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या आय एस ओ मानांकित आदर्श मराठी शाळा खरसईच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत कोकण,पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी ग्रामस्थांना आवाहन केले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावात प्रभातफेरी झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केलेल्या आवाहनाला विद्यार्थी पालक व ग्रामस्थांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी जमा झालेली मदतनिधी म्हसळा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापकांनी दिली.या उपक्रमाचे म्हसळा तहसीलदार गोसावी यांनी  कौतुक केले

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा