चिखलप आदिवाशी वाडी येथील अशोक तुकाराम पवार याचा घर अतिवृष्टीमुळे कोसळल्याचे दिसत आहे
सोमवारी आजाराने बायको वारली:गुरवारी आतिवृष्ठीमुळे घर कोसळून कुटुंबंब चावला:म्हसळा तालुक्यातील आदिवशी वाडी येथील घटना
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यातील एका आदिवाशी वाडीवर कावीळमुळे पत्नी वारल्याच्या दुखातून कुटुंबं सावरत असतानाच तिसर्याा दिवशी आतिवृष्ठीमुळे घर कोसळल्यामुळे तीन चिमुकली मुले बचावल्याची घटना घडली असून संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.चिखलप आदिवाशी वाडी येथील अशोक तुकाराम पवार वय 35 वर्षे याची पत्नी आशिका अशोक पवार वय 30 वर्षे ही कावीळ ह्या आजाराने त्रस्त असून तिचा सोमवारी 29 जुलै रोजी मृत्यू झाला.आशिका पवार हिला दोन मुली व एक मुलगा देखील आहे. आशिकच्या मृत्युतून संपूर्ण कुटुंब सावरत असताना नियतीने पुन्हा या कुटुंबावर दुखचा घाला केला असून गुरुवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी १च्या सुमारास अशोक पवार येचे राहते घर अतिवृष्ठीमुळे कोसळल्याची घटना घडली आहे.यावेळी घरामध्ये रोशनी पवार वय 12 वर्षे, रोशन पवार वय 10 वर्षे,रसिका पवार वय 7 वर्षे हे थोडक्यासाठी बचावले असून, घराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.सदर घटनेचा तलाठी मार्फत पंचनामा करण्यात आला असून 25 हजारच्या नुकसनाची नोंद
करण्यात आली आहे. एक आठवड्याच्या आत आदिवाशी समाजातील पवार कुटुंबाला नियतीने रस्त्यावर आणून ठेवले असून शासनाकडून मदतीसाठी प्रतीक्षेत आहे.
अतिवृष्ठीमुळे चिखलप आदिवाशी वाडी येथील अशोक पवार यांचे घर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी यांना तत्काल पंचनामा करून योग्य मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
-शरद गोसावी-तहसिलदार,म्हसळा
अशोक पवार याने पत्नीच्या इलाजवर संपूर्ण हातशिल्लक खर्च केली असून आता त्याचाकडे कुटुंबाला दोन दिवस जेवण देण्याचे देखील पैसे शिल्लकनाहीत.शासनाने अशोक पवार यांना तत्काल घरकुल मंजूर करून घर बांधून द्यावे.
-परशुराम मुकणे,अध्यक्ष-चिखलप आदिवाशी समाज

إرسال تعليق