म्हसळा तालुक्यात अतिवृष्टी चा कहर : युवकचा बुडून मृत्यू तर बेपत्ता शेतकर्याचा मृतदेह खरसई धरणात सापडला


म्हसळा तालुक्यात अतिवृष्टी कहर:संदेरी धरणात  युवकचा बुडून मृत्यू तर बनोटी येथून दोन दिवसानपासून बेपत्ता शेतकर्याचा मृतदेह खरसई धरणात सापडला

गणेश म्हाप्रळकर/निकेश कोकचा(म्हसळा)

म्हसळा तालुक्यात पावसाने आपला जोर वाढवला असून संदेरी धरणामध्ये पोहण्याचा नादात गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर तालुक्यातीलच बनोटी गावामध्ये गुरे चरवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा  मृतदेह दोन दिवसांनंतर धरणामध्ये  सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


म्हसळा तालुक्यातील आंबेत-संदेरी धरणावर आठ तरुण शनिवारी पोहण्यासाठी गेले होते.हे सर्व तरुण मुंबई येथून आपल्या मूळ गावी संदेरी येथे पावसाळी सुट्टीसाठी आले होते॰या आठ तरुणांमध्ये एक संदेरी येथील गणेश डावरुंग वय 25 वर्षे याने संदेरी धरणातील खोल भागामध्ये उडी मारली.यानंतर काही कालावधी तो बाहेर न आल्याने त्याचा मित्रांनी देखील त्याचा पाण्यात जाऊन शोध घेतल्या नंतर डावरुंग हा बेशुद्ध अवस्थेत सापडला.यानंतर या तरुणाला जवळील रुग्णालयात नेहल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुसरीकडे शनिवारीच तालुक्यातील बनोटी येथील हरीचंद्र गाणेकर वय 50 वर्षे हा शेतकरी गुरे चरवण्यासाठी जंगलामध्ये गेला होता.तेथे नदीचा ओंड पार करत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढून त्याचा पाय सरकला व 150 मीटर उंचीच्या धबधब्यावरून घरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.तहसिलदार शरद गोसावी,सर्कल दत्ता कर्चे,तलाठी शाह तात्या,पोलिस निरीक्षक  कांबळे ,पो.नाईक सूर्यकांत जाधव,वैभव पाटील यांच्यासहित ग्रामस्थांनी शनिवार व रविवारी घेतलेल्या सोधमोहिमे नंतर सोमवारी गाणेकर यांचा शव खरसई धरणामध्ये सापडला.यानंतर हा शव मेंदडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदनासाठी नेला असताना तेथील डों.प्राची यांनी शवविछेदन करण्यासाठी नकार दिला व शव ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी नेण्यात आला.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा