संजय खांबेटे : म्हसळा १७ प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन रविवार दि, 18/08/2019 रोजी सकाळी ठिक 11 वाजता घनसार कॉम्प्लेक्स हॉल, एस.टी स्टँड समोर (म्हसळा) येथे करण्यात आले आहे, मेळाव्याला पेण येथील काँग्रेसच्या रणरागिणी प्रशिक्षक नंदाताई म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मा. ज्ञानदेव पवार , श्रीवर्धन विधानसभेतील (श्रीवर्धन,म्हसळा, माणगाव, तळा, रोहा) सर्व तालुका अध्यक्ष, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉक्टर दानिश लांबे, श्रीवर्धन मतदार संघा चे अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष बशीरभाई भुरे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. मुईज अ. अजीज शेख व इतर मान्यवर मार्गदेशन करणार आहेत.कार्यक्रमाला श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व काँग्रेस हितचिंतकानी उपस्थित रहावे असे आयोजकानी अवाहन केले आहे.
" निर्धार मेळाव्याचे काँग्रेसचे मुख्य लक्ष श्रीवर्धन विधानसभा मतदार संघावर आहे. गेले १० वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस काँग्रेस पक्षाला कमकुवत समजत आहे. श्रीवर्धन मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे ह्याचा निर्धार या मेळाव्यात सर्व कार्यकर्ते करणार आहेत."
बशीरभाई भुरे, अध्यक्ष, अल्पसंख्याक सेल. श्रीवर्धन मतदार संघ

إرسال تعليق