म्हसळा करांची आरोग्याची स्वप्ने भंगली का ?राजकीय व्यवस्थेचे होते दुर्लक्ष
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका आरोग्य व्यवस्थेत ग्रामिण रुग्णालय, म्हसळा, मेंदडी व खामगाव येथे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र ,पाभरे येथील १ जि.प. दवाखाना व ९ उपकेंद्र अशी आरोग्य यंत्रणा तालुक्यात कार्यरत आहे.या सर्वच ठिकाणी अपुऱ्या पायाभूत सुविधा तज्ञ व प्रशिक्षीत व्यक्तींचा उपलब्धलेतील असमतोल . निधीची उपलब्धता , वापर यातील तफावत , आरोग्य सेवांची गुणवत्ता व्यापकता या सर्व बाबींमध्येच आडकल्याने ती परीपूर्ण मिळत नाही. ती सुमार दर्जाची आहे. ह्या सर्वाला स्थानिक राजकीय व्यवस्था, सरकारी यंत्रणा आणि आरोग्य व्यवसायीक अडथळा आणतात त्यामुळेच म्हसळा कराना आरोग्य सेवा मिळणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्याची लोकसंख्या ६१ हजार ५४६ आहे. याना ग्रामिण रुग्णालय, म्हसळा, मेंदडी व खामगाव या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रां मार्फत आरोग्य सेवा देण्यात येते . ग्रामिण रुग्णालयांत १ वैयकिय अधिक्षक व तीन वैयकीय अधीकारी ही पदे मंजूर आहेत . ती सर्व पदे रिक्त आहेत या पदांची मदार सध्या शालेय आरोग्य तपासणीचे वैद्यकिय अधिकाऱ्यांवर आहे.तालुक्यातील
म्हसळा शहरांत ग्रामिण रुग्णालय कार्यरत झाल्यामुळे म्हसळा प्रा.आ. केंद्र गेले ६ ते ७ महीन्यापासून बंद आहे.मेंदडी व खामगाव येथील २ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये १पद रिक्त आहे.पूर्ण तालुक्यासाठी आवश्यक असणारे तालुका आरोग्य अधिकारी हे पद ७ वर्ष रिक्त आहे .
आरोग्याची धुरा सांभाळणारे मिश्रक ३, आरोग्य सहाय्यक २ ( पुरुष) आरोग्य सहाय्यक माहिला २, आरोग्य सेवक ३, कनिष्ठ सहाय्यक १, आरोग्य सेविका ५ ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३ अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. आवश्यक सोयी सुविधांचे अभावी तालुक्यांतील बहुतांश उपकेंद्र बंद स्थितीत आहेत.
आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसे बजेट द्यायचे नाही, कर्मचारी भरती व औषध खरेदीकडे लक्ष देयचे नाही , व्यवस्थापनात बदल करायचे नाहीत, गुणवत्तेचा आग्रह धरायचा नाही, सरकारी यंत्रणेला वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि अप्रत्य क्षरीत्या खाजगी हॉस्पीटलला वाव देयचा असे धोरण आरोग्य व्यवस्थेत सध्य स्थितीत आसल्याचे जाणकारांचे मत आहे.
"रिक्त पदांचे बाबतीत जिल्हयाकडे दरमहा माहीती पाठविण्यात येते , रिक्त पदे भरणे शासनस्तरावरील पध्दती आहे."
-डॉ. सुहास मोरे, (प्र) तालुका आ. अधिकारी, म्हसळा


إرسال تعليق