संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहराचे ग्रामपंचायतीतून नगर पंचायतीत रूपांतर होत असताना शहरीकरणाचे बरोबरीने ,अन्य विकास होत आहे
लोकसंख्याही झपाट्याने वाढली असताना गुन्ह्यांचा आलेखही कमी होत नाही. मात्र त्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलिसांचा फौजफाटा वाढत नसल्याने म्हसळा शहरातील किरकोळ व अन्य गुन्हेगारीत वाढ होत आहे. यामध्ये राष्ट्रद्रोहा पासून घरफोड्या असे सर्व गुन्हे आहेत.
म्हसळा तालुक्यात सन १९७२ पर्यंत औट पोस्ट होते तालुका तेथे पोलीस स्टेशन या गृह विभागाच्या धोरणानुसार म्हसळा तालुक्या साठी पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली . त्यावेळेपासून म्हसळा पोलीस स्टेशनला गृह विभागाच्या अकृतीबंधानुसार १ पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, ५ सहाय्यक फौजदार, ११ हेड कॉस्टेबल, ५ पो.नाईक , १३ पो .कॉन्स्टेबल अशी मंजूर पदे आहेत. म्हसळा तालुक्यातील ८२ गावाची लोकसंख्या ५९ हजार९४१ आहे, यामधील १७ गावे नजीकच्या अन्य तीन पोलीस स्टेशनला जोडल्यामुळे ६५ गावातील ५२३४२ नागरीकांची जबाबदारी म्हसळा पोलीसांवर आहे. त्यामध्ये महीलांचे प्रमाण अधिक आहे. पोलीस स्टेशन मधील कर्मचारी -अधिकारी फिरती,रजा, कोर्ट पैरवी,तपास, गेम - प्रॅक्टीस, रिफ्रेशमेंट कोर्स या साठी कमी जास्त प्रमाणांत बाहेर आसल्याने २ हजार नागरीकांमागे केवळ १ पोलीस तैनात आसल्याची स्थिती आहे.
फोटो : म्हसळा पोलीस स्टेशन व अडगळीत पडलेल्या पाट्या दिसत आहेत.
म्हसळा पोलीस स्टेशनकडे रायगड पोलिस अधिक्षकांचे होत आहे दुर्लक्ष.
म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये क्राईम रेट कमी असतो असा नकळत समज होत आसल्याने पोलीस स्टेशन दुर्लक्षित आहे.परंतु १९९३ मधील मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांत श्रीवर्धन- म्हसळा येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांचा फार मोठा सहभाग होता ह्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याच अनुषंगाने गृह विभागाने म्हसळा तालुक्यात साई, वांगणी व कोळे येथे चेकपोस्ट निर्माती केली आहे. त्याच प्रमाणे रायगड पोलिस अधिक्षकांनी म्हसळ्यासह श्रीवर्धन व दिघी सागरी पोलीस स्टेशनला आवश्यक परिपूर्ण अधिकारी कर्मचारी देणे आवश्यक आहे. म्हसळयातीत गुन्हयांचा अभ्यास करता वहातुकीचे गुन्हे जास्त होत असतात तर अनेक वेळा गुन्हयांचे रुपांतर मॉप अॅटैक व त्याला धार्मिक जोड दिली जाते त्यामुळे निर्णय क्षमता असणारा अधिकारी असणे आवश्यक आहे व तशी मागणी स्थानिक जनतेची आहे. शहर व तालुक्याची लोकसंख्या वाढत आहे, व्यापारी व औद्योगिक प्रगती होत आहे तालुक्यांतून दिघी पुणे राष्ट्रीय महामार्ग आत आहे, त्यामुळे म्हसळा पोलीस स्टेशनला कायम स्वरुपी पोलीस निरीक्षक व आवश्यक रिक्त पदे भरताना अन्य पदे वाढविणे आवश्यक आहेत.
" गेले दिड महीना म्हसळा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नसल्याने गुन्हा तात्काळ नोंदविणे, ट्रॅफीक जॅम व अन्य छोटया मोठया गुन्हांसाठी वरीष्ठांजवळ बोलावे लागते हे जनतेच्या व पोलीसांच्या दृष्टीने चुकीचे आहे"
-महादेव पाटील , माजी सभापती, पं.स. म्हसळा.
" म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये पो. नीरीक्षक , पो. उप निरीक्षक २ पदे रिक्त आसल्याचा अहवाल वरीष्ठ कार्यालया कडे पाठविला आहे, पदे भरली जातील"
बापूसाहेब पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन


إرسال تعليق