दिघी - पुणे रस्ता : एम.एम.आर.डी.विरुद्ध खरसई येथे होणार रस्ता रोको आंदोलन


संजय खांबेटे : म्हसळा -प्रतिनिधी
माणगाव -दिघी हा खस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत झाल्यावर माणगाव पासून दिघीपर्यंत रस्त्याचे दोनही बाजूने रुंदीकरण करीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व संबधीत ठेकेदाराने स्थानिक शेतकऱ्यांची वाताहात करीत शेतकऱ्याना आपल्या शेतीत जाण्याचा मार्गच ठेवला नाही तशाच पध्दतीने खरसई येथील सोमजाई माता क्रिडामंडळ ट्रस्ट यांच्या मालकीच्या जागेतली तशाच पध्दतीने मार्ग व जागेचे अस्ताव्यस्त नुकसान केल्याने सोमजाई माता क्रिडामंडळ ट्रस्ट, ग्रामस्थ व हितचिंतकानी शासनाविरूध्द आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे,मंगळवार दि .२३ जुलै २०१९ रोजी माणगाव-दिधी रस्त्यावरील खरसई स्टॉप जवळ रस्ता रोको करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक नेते चंद्रकांत खोत यानी सांगितले. या आंदोलना पूर्वी शासनाकडे पत्रव्यवहार करूनही शासन व ठेकेदार डोळेझाक करीत आसल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आसल्याचे खोत यांचे म्हणणे आहे. आंदोलनानंतर या संपूर्ण मार्गावरील जमीनी जबरदस्तीने घेतलेल्या शेतकऱ्याना एकत्रित करुन त्याना मोबदला मिळवून देणे, शेतात, वाडी, वस्ती वर जाण्यासाठी आवश्यक जोड रस्ता करुन देणे या मागणीसाठी आंदोलन करणार आसल्याचे खोत यानी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व जमिनीचा मोबदला मिळावा याकरिता शेतकरी संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असल्याने रास्ता आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे




"माणगाव ते दिघी रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या जमीनी घेताना शेतकऱ्याना शेतावर मशागतीला जाण्यासाठी , ट्रॅक्टर, बैलगाडी व अन्य वाहतुकीचे साधने जाऊ शकेल आसा मार्ग देणे आवश्यक असताना ठेकेदाराने मार्गाच दिल्या नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत"
चंद्रकांत खोत , संस्थापक अध्यक्ष सोमजाई माता क्रिडामंडळ ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा