शासनाचे आदेशाला म्हसळा गटविकास अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली : १० तारीख उजाडली तरी शिक्षकाना पगार नाही



संजय खांबेटे म्हसळा  प्रतिनिधी
वर्षभर सातत्याने काम करून हक्काचे वेतन मिळविण्या साठीही  म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांना झगडावे लागत आहे. पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकाना १ जून  पर्यंत पगार द्यावे असे शिक्षण संचालकाचे पत्र असतानाही म्हसळा गटविकास अधिकाऱ्यानी सदर पत्राला  केराची टोपली दाखवली . महिन्याच्या १ तारखेस वेतन द्यावे असे असताना  प्रक्रियेतील ही दिरंगाई शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
  शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार व पं.स. चे अर्थ विभागाचा योग्य समन्वय नसल्याने तालुक्यातील शिक्षकाना 
 दर महिन्याच्या एक तारखेला अन्य विभागांतील कर्मचाऱ्यां-प्रमाणे शिक्षकांचे वेतनही होणे अपेक्षित आहे.वास्तविक पहाता महिन्याचे आर्थिक गणित बांधण्यापूर्वी हाती वेतन मिळणे अपेक्षित आहे. अनेक शिक्षकांनी घर अथवा तेथील सुविधांसाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. महागाईचा वाढता डोंगर, कुटुंबाची जबाबदारी आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी वेतन मिळणे गरजेचे आहे, मात्र उशिरा मिळणाऱ्या वेतनामुळे कष्ट करूनही ऐनवेळ दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे. म्हसळा तालुक्यातील शिक्षकाना हा त्रास प्रत्येक महिन्याला होत असतो.

शासनाचे आदेशानुसार पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकाना १ जून  पर्यंत पगार द्यावे असे स्पष्ट आदेश आसल्यामुळे जिल्हयांतील प्रा . शिक्षकांसाठी रु४० कोटी व केंद्रप्रमुखांसाठी रु ११ कोटीचा रेमीटन्स केला आहे.
- भाऊसाहेब थोरात प्र. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )

मागील दोन महीने L.I.C. शेड्यूल्ड चे निमित्त करीत पगार काढण्यास विलंब होत आहे. हक्काच्या वेतनासाठी शिक्षकांना लढा किंवा तक्रार द्यावी  लागणे हे उचित नाही.
-नितिन मालीपरगे, अध्यक्ष शिक्षक परिषद ,म्हसळा तालुका

 तांत्रिक बाबी असल्या तरी त्याचा फटका शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसणे योग्य नाही. इदीपूर्वी पगार मिळणे आवश्यक होते.
जनाब कौचाली , अध्यक्षअखील भारतीय उर्दु शिक्षक संघटना. म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा