म्हसळा प्रतिनिधी
आज म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात महाराणा प्रताप सिंह यांची ४७९ वी जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पं.स. माजी सभापती महादेव पाटील, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, कु. नाक्ती, विनोद सोनावणे,जैन समाजाचे कांतीलाल जैन, रजपूत समाजाचे व्यापारी खंगारसींह,नारायण सींह,पाबुसींह रजपूत , दिलीप चौधरी,प्रतिभा कदम, प्रगती केदार, रमेश शिद, गणेश पारवे, आप्पा गुरव, प्रविण जोशी, स्वाजीका शेडगे आदी वाचक उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रताप सिंह यांचा कार्यकाळ, राज्याभिषेक, वीरता, बहादुरी आणि मुघल वादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यादरम्यान वीरता, बहादुरी आणि हळदीघाटातील लढाई व झालेले युद्ध हे महाभारताच्या युद्धासारखे विनाशकारी सिद्ध झाल्या बाबतची सवीस्तर माहीती अध्यक्ष खांबेटे यानी दिली.
إرسال تعليق