संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व उनाड कुत्र्यानी नागरीकाना हैराण केले आहे. आज कुंभारवाडा परिसरांत उनाड कुत्र्यानी योगेश देऊळकर यांच्या घरी आलेल्या अर्जुन, आरोही आशा छोट्या २-३ मुलाना कुत्र्याने चावल्याची घटना घडली. मुलांचा भितीने आक्रोश होत होता. त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वेळी उपचार सुरु असताना म्हसळा शहरांत उनाड कुत्र्याची दहशत वाढत आहे तेवढयाच प्रमाणात शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढत असताना CEO काय करीत आहेत या बाबत कोणती पावले उचलली अशी जाणकारांच्यात चर्चा रंगली व तिथेच विरली.
मोकाट गुरे व उनाड कुत्र्यानी म्हसळाकर हैराण झाले आहेत. गुरांवर मालकांचे व नगरपंचायतीचे कोणतेही नियंत्रण नसल्याने गुरांचा शहरातील व्यापारी , परसावातील बागायतीदार, वाहतुक कोंडी या सर्वच बाबतीत त्रास होतो .आशाच पध्दतीने हिंदू व मुस्लीम भाविकाना उनाड कुत्र्यांचा त्रास होता हिंदू पहाटे सकाळी काकड आरती , रात्री भजन, तर मुस्लीम बांधवाना पहाटे व रात्री नमाजी साठी मशीदीत जावे लागते यावेळी उनाड कुत्र्यांची गँग दहशत निर्माण करतात. त्याबाबत नियंत्रण करण्यासाठी नगरपंचायतीचा सहभाग मोठा आहे आसे म्हसळा करांचे मत आहे.
"महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५चे २८५ प्रमाणे मोकाट गुरे खाजगी किंवा सार्वजनिक मालमतेच्या जागी अतिक्रमण , नासाडी करीत असल्यास त्याना कोंडवाड्यांत घालणे ही जबाबदारी नगरपालीका अधिकारी किंवा मुख्य अधिकाऱ्याची असते, अशाच पध्दतीने
नगरपंचायती अधिनियम १९६५चे २९३ प्रमाणे उनाड कुत्र्यांबाबत मुख्य अधिकाऱ्याना आधिकार असताना पालन का करीत नाही असा नागरिकांचा सवाल आहे.
अनेक वेळा शहरांत मोकाट गुरामुळे शहरांत होणारी ट्रॅफीक जॅमची सोडवणुक पोलासाना गुरे हाकलून करावी लागते ही जबाबदारी नगरपंचायतीची अर्थात C.E.O. ची आहे.
-कांती भाऊ, सामाजिक कार्यकर्ते



إرسال تعليق