म्हसळा पंचायत समीती ओस : लग्न सराई मुळे बहुतांश आधिकारी कर्मचारी रजेवर



संजय खांबेटे : म्हसळा 
पंचायत समितीचा कारभार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनतेशी निगडीत महत्त्वाचा भाग आहे. आज सोमवार असुन कार्यालय बहुतांश पणे ओस पडलेले पाहाणीत आले. तोच प्रकार शिक्षण विभागात होता. तालुक्यातील बहुतांश भाग टंचाईग्रस्त असुन त्याच्याशी निगडीत ग्रांमपंचायत , पाणी पुरवठा ही आधिकारी मंडळी रजेवर आसल्याने तालुक्यातील ग्रामिण जनतेला आर्थिक व मानसीक त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. याच वेळी सभापती - उपसभापतींच्या निर्दशनास आल्यावर बहुतांश टेबल खुर्चा रिक्त होत्या. त्यानी संबंधीताना सुचना देऊन नागरीकाना हेल फाटे मारावे लागणार नाही याची काळजी घेण्या संर्दभात सूचना दिल्या व प्रत्यक्ष पहाणी केली असता ग. वि. अ. व आरोग्य पर्यवेक्षक ,९ आधिकारी कर्मचारी रजेवर, अशी परिस्थीती आसल्याची खातरजमा केली. यावेळी अर्थ, शिक्षण, ग्रामपंचायत अशा महत्वाच्या खात्यातील कर्मचारी रजेवर होते.


पंचायत समितीचे कार्य तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या व प्रत्येक अंगाशी निगडीत असते. शासनाच्या तालुका पातळीवरील बहुतांश जबाबदाऱ्या या पंचायत समितीकडे असतात त्यामुळे  एकाच वेळी मोठ्या प्रमाणांत आधिकारी कर्मचारी रजेवर असणे हे चुकीचे आहे. मागील महीन्यांत सुध्दा असाच प्रकार झाला होता मी वरीष्ठांकडे योग्य वेळी बोलणार आहे.
- श्रीमती छाया म्हात्रे, सभापती पं.स. म्हसळा.

पंचायत समितीचे बहुतांश विभागात आधकारी कर्मचारी नव्हते.एखाद्या विभागातील एकाच वेळी रजेवर पाठविणे ही प्रशासकीय उणीव आहे.
-संदीप चाचले , उपसभापती म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा