म्हसळा तालुक्याचा निकाल ८९ . ३९ टक्के



म्हसळा : प्रतिनिधी
२८ मे रोजी जाहीर झालेल्या १२ वी परीक्षेमध्ये तालुक्याचा निकाल ८९ . ३९ टक्के लागला . आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनि . कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे . त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा कला विभागाचा निकाल ६७ . २१ टके लागून दिपक वतारे ७३ . ८४ प्रथम , परशुराम मांडवकर ७२ . १५ द्वितीय तर आलशा जाधव ६८ . ६९ तिसरी आली आहे . वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९९ . ३८ टक्के लागला असून संदेश बोर्ले ८४ . ३० प्रथम , सुरज आंग्रे ८३ . २३ द्वितीय आणि मिनाक्षी जैन ८१ . ६९ तिसरी आली .

मागास वर्गीयांत स्निधी साळवी ७१.३८ प्रथम , आलिशा जाधव ६८ . ९२ द्वितीय तर सपना मोहिते ६६ . ३० गुण मिळवून तिसरी आली . अंजुमन इस्लाम कॉलेज म्हसळा येथील विज्ञान शाखेतून बशरा शिर्शिकार हिने ७४ टक्के गुण मिळवून प्रथम , यासर इनामदार याने ७३.२३ टक्के गुण मिळवून दुसरा तर ७३ ०७ टक्के गुण मिळवून फरौन मुकादम हिने तिसरा क्रमांक पटकावला . आयडियल इंग्लिश स्कूलची हुदा काळोखे हिला ८२ . ७६ टक्के गुण मिळून प्रथम , सिद्रा को हिला ७८ . ७६ गुण मिळून दुसरी तर युसूफ दामाद यास ७५ , ८४ टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक पटकावला . मौलाना आझाद हायस्कुल पांगळोली येथून हवा फवाज एजाज यास ७१ . ५३ टक्के गुण मिळून प्रथम , ताहरीन म . इशाक ६८ . ४६ गुण मिळवून दुसरी तर निदा अस्लम धनशे हिस ६८ ट गुण मिळून तिसरा क्रमांक मिळविला सर्व यशस्वी विद्याथ्याचे संस्थेचे पदाधिकारी जमिर कादिरी , समिर बनकर , नसिर मिठागरे , फझल हालडे याकूब खान आणि तालुक्यातील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा