म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा शहरातील प्रतिपंढरपुर असलेल्या गवळवाडी येथे बाळमित्र ग्रामस्थ व मुंबई मंडळ, शिवांजली क्रिकेट संघ यांचे संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 16 वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साही व आंनदात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्याने अभिषेक सोहळा, पालखी मिरवणूक सोहळा, श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती, महाप्रसाद, सुस्वर भजन, विद्यार्थी गुणगौरव आदी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवांजली क्रिकेट क्लबच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. मुंबई येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत शिवांजली क्रिकेट क्लबने विजयश्री प्राप्त केलेले 51 हजाराची बक्षीस रक्कम सदस्यांनी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अशोक काते यांचेकडे सुपुर्द केली. विद्यार्थी वर्गाला गाव सदस्य श्यामभाऊ कासार यांचे मार्फत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सुनिल दिवेकर यांचे वतीने पालखी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मुर्ती मंदिरात प्रदान केली. गावातील बहुतांश सदस्यांनी मोठया प्रमाणात देणगी व अन्नदान केले. अनेक भाविक भक्तगणांनी देवदर्शन व पुजा प्रसादाचा लाभ घेतला.
आयोजित कार्यक्रमात शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, नगरसेवक संतोष काते, नगरसेविका सेजल खताते, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट विश्वस्त प्रीती खताते, स्थानिक अध्यक्ष अशोक काते, संघटक मंगेश महाडिक, संजय खताते, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमेश खताते, जेष्ठ कार्यकर्ते दशरथ काते, सुनिल दिवेकर, शरद काते, सचिव प्रमोद काते, नितीन दर्गे, मिलिंद काते, रुपेश खताते, प्रकाश कासार, महादेव रिकामे, सुभाष कासार, मंगेश खताते, राजेंद्र खताते, राकेश ठसाळ, अंकुश नटे, दुर्गेश खताते, मोहन कासार, परेश खताते, पवन खताते, राजकीरण खताते, उदय चोगले, सुर्यकांत महाडिक, महादेव काते, प्रसाद चोगले, प्रसाद काते, शांताराम बिरवाडकर, रामकृष्ण दर्गे, विजय खताते, पंडित खेडेकर, महिला मंडळ, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन गवळवाडी गावाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी गावात एकता आणि वैभव प्राप्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق