गीतेंचे काम दाखवा : १००० रु मिळवा - सुनील तटकरे


बॅ. अंतुलेंचे रेवस रेड्डी मार्गाचे स्वप्न पूर्ण करणार : सुनील तटकरे

संजय खांबेटे :म्हसळा
शिवसेनेचे उमेदवार अनंत गीतेनी केलेले काम दाखवा रू १००० मिळवा जरुर वाटली तर कंदील सोबत घ्या बघा दिसते का विकास काम , केंद्रात अवजड उद्योग मंत्री असणारे गीते व राज्यांत उद्योग खाते संभाळणारे सुभाष देसाई यानी किती कुणबी युवकाना रोजगार दिला करा आभ्यास असा घाणाघाती हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यानी म्हसळा येथील प्रचार सभेत केला यावेळी शेका पक्षाचे अलिबागचे आमदार पंडीत शेठ पाटील, आ. अनिकेत तटकरे,महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप, गुलाम पेशमाम, काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर, ऑल इंडिया छात्र संघटनेच्या सानीया धूम, माजी आमदार सुहेल लोखंडवाला आदी उपस्थित होते. तटकरे यानी युपीए सरकारच्या काळात राजीव गांधी ,सोनीया गांधी व मनमोहन सींग यांच्या काळातील सरकार  अतीशय चांगले होते त्यांच्याच काळात मोबाईल क्रांती झाली. असे सांगत २०१४ ला आलेल्या NDA सरकार, पंतप्रधान मोदी, शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते , उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. मोदींचे अच्छे दिन, भाजपाचे १५ लाख रुपये आलेच नाही उलट आमचा निवडणुक जुमला आसल्याचा खुलासा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा करतात याची तटकरे यानी खिल्ली उडविली. एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे चौकीदार चोर हैं अशी पंतप्रधान मोदींची अवहेलना करीत आता तेही त्यात सामिल झाले, केंद्रांतील सरकार नालायक आहे, राज्यांतील सरकार सुद्धा नालायक आहे उद्धवजी तुमच्या डाव्या बाजूला बसणारे गीते, उजव्या बाजूला बसणारे सुभाष देसाई, रामदास कामत हे कोण आहेत याचा तुम्हाला जनतेला जाब द्यावा लागेल अन्यथा जनता तुम्हाला सोडणार नाही असे तटकरे यानी ठणकावून सांगितले. मी अन्न नागरी पुरवठा, अर्थ, जलसंपदा, उर्जा खात्याचा मंत्री असताना संपूर्ण रायगड, रत्नागिरी तील वाडी, गाव, शहर पातळीवर  सर्वच स्थरांतील विकास साधला आहे . गीते ना अवजड खाते आसून ही रायगड- रत्नागिरी मध्ये एकही उद्योग किंवा बेरोजगारीची समस्या सोडविता आली नाही हा मुद्दा टिकेचे लक्ष करीत , संसद ग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या दिवेआगरला केवळ स्वच्छतागृहे दिली याबाबत लक्ष केले. रेवस ते रेड्डी हे बॅ .अंतुले साहेबांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करणार या मार्गावरील बांगमांडला ते बाणकोट हा तब्बल २५० कोटीच्या  पुलाचे काम आमच्या कालावधीत सुरु झाले आसल्याचे त्यानी सांगितले. महाडचे माजी आमदार माणीकराव जगताप यानी आपल्या आभ्यासू भाषणांत गुहागर पासून आलिबाग पर्यंतच्या सहाही विधानसभा मतदार संघात तटकरे साहेबाना आघाडी मिळणार आहे किमान दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्क मिळणार असल्याचे जगताप यानी  सांगितले. क्रिकेट मध्ये मॅच फिक्सींग असते असे मला माहीत होते पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व  पंतप्रधान मोदी यांचे अतीरेकी हल्ला -हवाई हल्ला हे सर्वच फिक्सिंग आहे. म्हणून इम्रान खानना मोदीच पंतप्रधान हवे आहेत असा आभ्यास जगताप यानी सादर केला. यावेळी म्हसळा तालुक्यातील व शहरातील नागरीकानी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा