तालुक्यांत ७२ मतदान केंद्र : ४९ हजार ५३० मतदार
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत ७२ मतदान केंद्र , सुमारे ४९ हजार ५३० मतदार आहेत निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पार पाडण्यासाठी पोलीस दलावर फार मोठी जबाबदारी असते. निवडणुक कालावधीत गोंधळ होऊ नये म्हणून सुमारे २५२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे म्हसळा पोलीस स्टेशनचे सपोनी प्रविण कोल्हे यानी सांगीतले. पोलीस अधिक्षक रायगड यांच्या आदेशा नुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, निवडणुकीच्या दरम्यान गोंघळ घालण्याची शक्यता असणाऱ्या , अवैध दारु विक्री करणाऱ्या , यापूर्वी गुन्हे नोंद आसलेल्या व्यक्तींची तसेच यापूर्वी झालेल्या निवडणुकांत व्यत्यय आणणाऱ्यांची माहीती पोलीस रेकॉर्ड ला असते ह्या माहीतीच्या आधारे CRPC ११० , १०७, मुं. पो. अॅ. ९३ प्रमाणे व १४९ प्रमाणे कारवाई प्रस्तुत आहे.तालुक्यांत निवडणुकीच्या काळात कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सर्तक आसल्याचे कोल्हे यानी सांगितले.

إرسال تعليق