तालुक्यात पाण्याच्या योजना अनेक ; समस्या एक - पाणीटंचाई


म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्याची पाण्याची मूळ समस्या काही अंश दूर झाली असली तरी ग्रामीण भागामध्ये आजही पाण्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आजही दिसत आहे . महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि सुलभ पद्धतीने योग्य वेळेत शुद्ध स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी शासनाने आजपर्यंत शेकडो योजना स्वजल धारा , पतदर्शी , भारत निर्माण , राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना , मुख्यमंत्री ग्रामीण योजना , जलस्वराज टप्पा अशा योजना तयार करून आपले उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी शासनाने तालुक्यातील अधिकारी ग्रामपंचायती ग्रामस्थ यांच्या सुसंवादातून या चालू असताना देखील त्या योजना घोणसे , निवाची वाडी , घोणसे विचारे वाडी , सुरई , बौद्धवाडी , देवघर कोंड , मेंदड़ी कोंड , तोंडसुरे प्रादेशिक , खामगाव गौळवाडी , पाभरे , म्हसळा , म्हसळा गौळवाडी या गावात समिती संथ गतीने काम करीत असल्यामुळे योजना आजही अपु-या आहेत . तेथील ग्रामस्थ पाणीपुरवठा कमिटी ग्रामपंचायत समिती संबधित अधिकारी यांच्या संगमत नसल्याकारणाने आज तेथील ग्रामस्थांना पाण्याचे चटके सोसावे लागत आहेत . अनेक गाव व वाड्या आहेत की , त्यांना अजूनही पाणीपुरवठा न झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात . एप्रिल , मे आला की गावात पाणी टंचाईचे प्रमाण वाढायला सुरूवात होते अशा अवस्थेत देखील टंचाईग्रस्त पथावरील योजना पूर्ण करणे , संबधित योजनेला पूरक करणे , योजनेची विशेष दुरुस्ती करणे , वापरात असणा-या विंधन विहिरी दुरुस्त करणे , स्थानिक विहिरी अहिग्रहित करणे असे विविध पर्याय वापरल्यानंतर संबधित गाव-वाड्या टँकरने पाणी पुरवठा करण्याचे समितीच्या माध्यमातून सुचविण्यात येते . रायगड जिल्हा परिषद माध्यमातून जी कामांची पूर्तता झालीच नाही . तीच परिस्थिती म्हसळा तालुक्याची आहे . अशा अपु-या सोयींमुळे म्हसळा तालुक्यात टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे . म्हसळा तालुक्यात समस्यावर मात करण्यासाठी शासनाच्या आराखड्यानुसार २०१८ - १९ ई - निविदा स्तरावर भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पियेजल योजना या गोंडघर में हिल्ला , तुरुंबाडी , काळसुरी , सुरई मोहल्ला , खारगाव खुर्द , मांडटने , केलटे बाऊळ ककोंड , सोनघर , रेवली , वार्डबा , कोंझरी , ठाकरोली , लिपनी वावे , या गावात आज चालू आहेत . म्हसळा तालुक्यात सुरु असलेल्या योजना म्हसळा गौळवाडी , चीराठी , दुर्गवाडी , डोरजे , कुडतुडी , गौळवाडी , देवघर , खारगावखुर्द , पाभरे , निग डी , कांदळवाडी , तोंड्सुरे प्रादेशिक , खरसई , मेंदड़ी कोंड , गोंडघर , वाडंबा , जांभूळ , केलटे , पानवे , कोंझरी , आडी , नेवरूळ , घूम , रुद्रवड , कोकबळ , सालविंडे , बाग चीवाडी , भापट , चिखलप , देहेन , वांगणी , कणघर , खाम गाव , कृष्णनगर , लेप , वाघाव , लेप गौळवाडी , वाघाव गौळवाडी अशा ३८ गावामध्ये योजना चालू आहेत परंतू पाण्याची टंचाई दुर होतच नाही . पाणी साठा वाढावा म्हणून शासनाने वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला त्याच बरोबर डॉ . श्री नानासाहेब धर्माआधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी देखील वृक्ष लागवडी पासून संवर्धन पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कार्य केले आहे तेव्हा पासून वृक्षांचे प्रमाण वाढले आहे तरी देखील तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे . 

म्हसळा शहराची योजना अपुर्णच . .
म्हसळा शहाराची योजना आजही अपुरीच आहे. या योजनेसाठी शासनानी वेळोवेळी आपली प्रक्रीयेत बदल करत योजना कशी पूर्ण होईल हे पाहिले आहे . परंतु ठेकेदार मात्र काही काम करण्यास तयार नाही . जो ठेकेदार दिला , तो देखील राजकीय नेत्याने दिला . मुळात या योजनेचे अनेक वेळा भूमिपूजन केले . विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील या योजनेचे भूमिपूजन केले परंतु आजही स्थिती जैसे थे आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा