मतदानासाठी सुमारे १५ हजार कर्मचारी सज्ज ; आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई - विजय सूर्यवंशी


विविध पथकांना अधिक काटेकोर तपासणीचे आदेश

मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा  

३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील  निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून मंगळवार २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे  सज्ज आहे, पुढील दोन दिवस पोलीस आणि विविध पथकांना अतिशय काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक तपासण्या करण्याचे निर्देश दिले असून कोणतेही बेकायदेशीर तसेच आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य सहन करणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात १४४ कलम लावण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे व  एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावा असे आवाहनही त्यांनी  केले.

या पत्रकारपरिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.  



१६ लाख ५१ हजार ५६० मतदार
३२ –रायगड मतदारसंघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला ८ लाख ४२ हजार २१४आणि तृतीयपंथी ३ आहेत.  (मतदारसंघनिहाय:  पेण ३ लाख ७६ , अलिबाग २ लाख ९२ हजार ४२१, श्रीवर्धन २ लाख ५६ हजार १८०, महाड २ लाख ८४ हजार २३०, दापोली २ लाख ७९ हजार २३८, गुहागर २ लाख ३९ हजार ४१५ )



नवमतदार
आमच्या मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळेस १८ ते १९ या वयोगटातील तरुण 35452 नवे मतदार मतदान करणार आहेत.



 २१७९ मतदान केंद्रे
मतदारसंघात एकूण २१७९ मतदान केंद्रे आहेत. १९९६ ग्रामीण भागात तर १८३ शहरी भागात आहेत

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा