श्रीवर्धन : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.श्रीवर्धन शहर हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते . शिवजयंती ,ईद, होळी ,रमजान ,मोहरम या सारख्या सणांना श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस तुकड्यांची कुमक मागवली जाते .श्रीवर्धन शहरातील सर्व ठिकाणांचा आढावा घेण्यासाठी पोलीस दला ने श्रीवर्धन शहरात पोलीस संचलन केले .या संचलनात 3 अधिकारी ,राज्य राखीव पोलीस दलाचे 32,श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील20 ,होमगार्ड 10 यांचा समावेश होतो .
पोलीस दलाला सर्व भागाची माहिती व्हावी .तसेच जनतेत सुरक्षितेचि हमी निर्माण होण्यासाठी पोलीस दलाचे संचलन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे.
-बाळकृष्ण जाधव (पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )

إرسال تعليق