म्हसळा – धनगरमलई – बोर्ली मार्गावर एसटी बसचा अपघात ; १७ जखमी


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातून धनगरमलई मार्गे बोर्ली जाणाऱ्या एसटीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांत इतर प्रवासी चालकाच्या प्रसंगवधनाने थोडक्यात बचावले. १७ जण किरकोळ जखमी झाले.


गुरुवार दि २२ फेब्रुवारी रोजी बसचालक गौतम कांबळे सकाळी ९ च्या सुमारास आपल्या ताब्यातील म्हसळा धनगरमलई मार्गे बोर्ली हि एसटी बस घेऊन निघाले. धनगरमलाई परिसरात आल्यावर एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाला असल्याचे चालक जाधव यांच्या निदर्शनात आले. या नंतर चालक जाधव यांनी सदर एसटी रस्त्याचा बाजूला दाबल्याने मोठा अपघात टळला. शाळकरी विद्यार्थ्यांसह १७ जण किरकोळ जखमी झाले. जखमीना बोर्ली येथील प्राथमिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा