म्हसळा येथील बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतीक विभागा अंतर्गत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहाच्या आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मीर मधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ मधील जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कु.प्रणिशा गाणेकर हीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे प्रास्ताविक केले त्यामध्ये शिवजयंती उत्सव सोहळ्याचे महत्त्व तिने उदबोधित केले त्यानंतर सांंस्कृतिक समितीचे प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांंनी शिवछत्रपतीचे वेगळेपण याविषयावर आपले विचार मांडताना महाराजांचे कार्य इतर राजापेक्षा कसे वेगळे होते हे स्पष्ट करताना शिवाजी महाराज वारसाहक्काने राजा झाले नव्हते त्यांनी राज्य निर्माण केले होते ते राज्य संस्थापक होते त्यामुळे त्याचेे महत्त्व अनमोल होतेे म्हणुन साडेतीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजाची जयंती आपण आजही मोठ्या आनंदात आणि चैतन्ययमय वातावरणात साजरी करतो म्हणुनच विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः मिळविण्याचा प्रयत्न करावा स्वतः कष्ट करून मिळवलेल्या कोणत्याही यशाची किंमत आयत्या मिळालेल्या यशापेक्षा अनमोल असते आणि तेे यश चिरकाल स्मरणात राहते असे सांंगितले .महविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. संजय बेद्रें सरांनी शिवचरित्र यावर विचार मांडताना महाराजांचे कुशल नेतृत्व ,महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य , महाराजाचे गनिमीकावा तंत्र , महाराजांचा स्रीयां बद्दल असणारा आदरयुक्त दृष्टिकोन रयतेची काळजी, अपराध्याला कठोरात कठोर शिक्षा या आणि इतर अनेक गुुणवैशिष्ट्यावर ऐतिहासिक दाखल्याच्या आधारे प्रकाशझोत टाकताना आजच्या काळातील परिस्थितीबाबतची देखील विद्यार्थ्यांना माहिती दिली.अध्यक्षस्थानावरुन आपले मनोगत मांडताना महविद्यालयातील प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन.राघव राव सर म्हणाले कि मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशाप्रकारे शैक्षणिक दृष्टिकोनातून साजरी केलेली शिवजयंती पाहिली नाही आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी महाराजांचे चरित्र अतिशय शांत पणे मनापासून ऐकत होते त्याबाबत समाधान व्यक्त केले आणि महाविद्यालयातील इतिहास विभागाने ऐतिहासिक शस्त्रास्त्रे प्रदर्शन आणि ऐतिहासिक नाण्याचे प्रदर्शन आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली शिवजयंती सोहळ्यात श्री राजेश गोविलकर यांच्या खड्या आवाजात आणि कल्पेश गाणेकर यांच्या संगीताच्या साथीने सांस्कृतिक समिती गीतमंचाने शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती, महा राष्ट्र गीत,वेगात वीर दौडले सात आणि इतर गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली श्री.सौरभ जगंम या व्दितीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांने कार्यक्रमाचे आभार मानले तर प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थी श्री.पुष्पेद्र वळवी याने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले शिवजयंती उत्सव सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात प्रा.शिरीष समेळ यांच्या मार्गदर्शनखाली तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी तसेच श्री. हेमकांत वाघे,कु.दिपाली नाक्ती, निखिल वाघे, कातकर ,ओमकार गाणेकर ,भुमिती पाटिल, नुतन पायकोळी,सुषमा पायकोळी,नयना पायकोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Admin Team
0

إرسال تعليق